Sevagram development plan blossomed the city's beauty | सेवाग्राम विकास आराखड्यामुळे शहराचे सौंदर्य फुलले
सेवाग्राम विकास आराखड्यामुळे शहराचे सौंदर्य फुलले

ठळक मुद्देबापूंची १५० वी जयंती : राज्य शासनाकडून मिळाला २६६ कोटीचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या पावन पदस्पर्शाने वर्ध्याची ही भूमी ऐतिहासिक पटलावर आली आहे. त्यामुळे वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा म्हणून ओळखल्या जात असल्याने महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त सेवाग्राम विकास आराखडा मंजूर करीत त्याच्या माध्यमातून वर्धा शहरासह परिसरातील विविध विकास कामे प्रगतीपथावर आहे. यामुळेच शहराच्या सौदर्यातही भर पडली असून बदलले रुप वर्धेकरांना आणि पर्यटकांना खुणावत आहे.
सेवाग्राम हे स्वातंत्र्य चळवळीचे उर्जास्थान राहिले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सेवाग्राम आश्रमातील आदिनिवास या कुटीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. येथे महात्मा गांधीसह दिंग्गज नेत्यांचे वास्तव्य राहिले आहे. त्यामुळे अहिंसेच्या मार्गावर चालत देशाला स्वालंबानाचा संदेश देणाऱ्या या सेवाग्राम आश्रमाची ख्याती देश-विदेशात आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक सेवाग्राम येथील बापू कुटीत आणि पवनार येथील आचार्य विनोबा भावे यांच्या आश्रमाला भेट देण्यासाठी येतात.परंतु या ऐतिहासिक स्थळासह वर्धा शहर विकासापासून कोसो दूर होते.
त्यामुळे आपल्या शहराला जागतिक पातळीवर ओळख निर्माण करुन देणाºया सेवाग्राम व पवनार या स्थळांचा विकास साधला जावा, अशी वर्धेकरांची ईच्छा होती. त्यामुळेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून राज्य शासनाने २६६ कोटी रुपयाचा सेवाग्राम विकास आराखडा तयार केला. त्याला मंजुरी देत निधीही उपलब्ध करुन दिल्यामुळे सेवाग्राम,पवनार व वर्धा शहरातील अनेक स्थळ व चौकांच्या विकासाला गती देण्यात आली आहे. त्यामुळे शहराच्या सौदर्यीकरणात भर पडल्याने शहराला नवीन वैभव प्राप्त झाले आहे.

निम्मे अधिक काम पूर्ण, उर्वरित प्रगतीपथावर
शहरातील प्रमुख रस्त्यांचे चौपदरीकरण व सुशोभिकरण करण्यात आले.परंतु चौकांच्या सौदर्यीकरणाकडे दुर्लक्ष झाले होते. आता सेवाग्राम विकास आराखड्यातून महात्मा गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, झांशी राणी चौक, बजाजवाडी चौक, विश्रामगृह चौक, गीताई मंदिर चौक, गोपुरी- नालवाडी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सेवाग्राम येथील कस्तुरबा चौक, जुना सेवाग्राम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आदी परिसराच्या सौदर्यीकरणाचे काम प्रगतीपथावर आहेत. या ठिकाणी लाल दगडांची भिंत बांधणे, वृक्षारोपण, बगीचा, बेंचेस, सायकल ट्रॅक, फुटपाथ, विद्युतिकरण करण्यात येणार आहे. सोबतच शहराच्या सिमेवर साईनजेस व गेटवेजेस लावण्यात येणार आहे. हा प्रयोग जिल्ह्यात प्रथमच करण्यात येणार असून त्या अंतर्गत सिमेवर होर्डिंग्ज लावून माहिती फलक व लायटिंग लावली जाणार आहे. यातील बहूतांश कामे पुर्णत्वास गेली असून शिल्लक राहिलेली कामे प्रगतीपथावर आहेत.

Web Title:  Sevagram development plan blossomed the city's beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.