उपडाकघर कार्यालयातील सेवा झाली पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:01 IST2017-10-27T01:01:39+5:302017-10-27T01:01:55+5:30

उपडाकघर कार्यालयातील सेवा झाली पूर्ववत
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : स्थानिक उपडाकघर कार्यालयातील इंटरनेट सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. यामुळे नागरिकांसह अधिकारी, कर्मचाºयांनाही दिलासा मिळाला आहे. शिवाय कामांनाही गती आली आहे.
सेवाग्राम आश्रम मार्गावरील डाक व तार विभागाचे उपडाक घर आहे. ९ आॅक्टोबर रोजी दुपारच्या दुमारास वीज कडाडल्याने इंटरनेट सेवा प्रभावित झाली होती. यामुळे कार्यालयातील व्यवहारिक पत्रे आदी सर्व व्यवहार थांबले होते. सेवेसाठी संबंधितांना वर्धेला धाव घ्यावी लागत होती. येथे महाविद्यालये, दवाखाना, कार्यालय आदींचा पसारा मोठा असल्याने तथा या डाकघराशी अन्य गावे जुळली असल्याने सर्वच कामे थांबली होती. याबाबत ‘लोकमत’ वृत्त प्रकाशित केले. वर्धा कार्यालयाने या वृत्ताची दखल घेत नव्या राऊटरची जोडणी करून दिली. यामुळे सोमवारपासून कार्यालयातील कामकाजाला पूर्ववत प्रारंभ झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
उपडाकघरात छतावरील पाणी लिक होत होते. पाणी अचानक टेबलवर पडत असल्याने साहित्याचे नुकसान होत होते. कार्यालयाने बचाव म्हणून प्लास्टीकची झोपडी करीत संगणकांना सुरक्षा दिली. यामुळे कामकाजासाठी येणाºयांना हा प्रकार विचित्र वाटत होता. वर्धा कार्यालयाने इंटरनेट सेवा बहाल करीत दुरूस्तीही केली. यामुळे प्लास्टिकची झोपडीही काढून टाकण्यात आली.