प्रामाणिकपणे रुग्णसेवा करा

By Admin | Updated: January 28, 2016 02:13 IST2016-01-28T02:13:05+5:302016-01-28T02:13:05+5:30

कुठलीही वैद्यकीय सेवा देताना कर्मचाऱ्यांनी सर्वप्रथम रूग्णसेवा ही ईश्वर सेवा आहे हे समजणे गरजेचे आहे.

Serve patients honestly | प्रामाणिकपणे रुग्णसेवा करा

प्रामाणिकपणे रुग्णसेवा करा

संजय जायसवाल : जिल्हा सामान्य रुग्णालयात इपिलेप्सी शिबिर
वर्धा : कुठलीही वैद्यकीय सेवा देताना कर्मचाऱ्यांनी सर्वप्रथम रूग्णसेवा ही ईश्वर सेवा आहे हे समजणे गरजेचे आहे. त्यामुळे रुग्णांची सेवा ही प्रमाणिकपणे करावी असे आवाहन नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ. संजय जायसवाल यांनी केले. जिल्हा सामान्य रूग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत इपिलेप्सी फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने इपिलेप्सी शिबिर आयोजित केले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. जायसवाल बोलत होते.
शिबिराचे उद्घाटन खासदार रामदास तडस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आरोग्य सभापती मिलिंद भेंडे, नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे उपस्थित होते. मंचावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अनुपम हिवलेकर, सर्कल प्रोग्राम मॅनेजर, डॉ. मनीष नंदनवार, एनएचएम व इपिलेप्सी फांऊडेशनचे डॉ. सूर्या आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांनी केले. यावेळी त्यांनी सामान्य रूग्णालयामध्ये सुरू असलेल्या सर्व विभागाची माहिती दिली. जननी सुरक्षा योजना, अर्श, आयुष, एनआरसी ट्रामा केअर युनिट, डायलिÞसीस युनिट, क्ष किरण विभाग याविषयी देखील त्यांनी माहिती दिली. सोबतच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘प्रेरणा प्रकल्प’ राबविण्यात येत असून आतापर्यंत ३४५५ शेतकऱ्यांना बाह्यरूग्ण विभागामध्ये तर ४१ रूग्णांना आंतररूग्ण विभागामध्ये सेवा देण्यात आल्याचे प्रास्ताविकात सांगितले.
डॉ. सूर्या यांनी इपिलेप्सी विषयी सविस्तर माहिती दिली. रूग्णांना मिरगी आल्यास बुवाबाजी न करता डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आरोग्य सभापती भेंडे यांनी इपिलेप्सी कॅम्प आयोजित केल्याबद्दल आरोग्य विभागाचे आभार मानले. खासदार रामदास तडस यांनी सर्व जनतेनी रुग्णालयात मिळत असलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा असे सांगितले. तसेच या सोईसुविधांचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहचण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाने तत्पर असल्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रूग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी वृंद तसेच एनसीसी कॅडेट परिचारिका प्रशिक्षण विद्यालयातील विद्यार्थिनी यांचे सहकार्य लाभले.
संचालन मॅसन यांनी केले. आभार डॉ. निवृत्ती राठोड यांनी मानले. कार्यक्रमानंतर जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व खासगी डॉक्टरांकरिता कार्यशाळा आयोजित होती. जिल्ह्यातील डॉक्टर्सची यावेळी उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Serve patients honestly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.