रुग्णसेवा करताना परिचारिकांमध्ये समर्पण भाव हवा
By Admin | Updated: November 18, 2015 02:19 IST2015-11-18T02:19:29+5:302015-11-18T02:19:29+5:30
परिचर्या हा रुग्णसेवेचा कणा आहे. रुग्णांची सुश्रुषा करताना परिचारकांनी समर्पण, प्रेमभाव आणि त्यागाची भावना आपल्या मनात निरंतर जोपासली पाहिजे, ....

रुग्णसेवा करताना परिचारिकांमध्ये समर्पण भाव हवा
पुरुषोत्तम मडावी : राधिका मेघे परिचारिका महाविद्यालयात ‘लॅम्प लायटिंग समारोह’
वर्धा : परिचर्या हा रुग्णसेवेचा कणा आहे. रुग्णांची सुश्रुषा करताना परिचारकांनी समर्पण, प्रेमभाव आणि त्यागाची भावना आपल्या मनात निरंतर जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी केले. दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ संचालित सावंगी (मेघे) येथील राधिका मेघे परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयाच्या दीपप्रज्वलन व शपथविधी समारोहात ते बोलत होते.
दत्ता मेघे सभागृहात आयोजित या समारोहाच्या अध्यक्षस्थानी अभिमत विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. व्ही. के. देशपांडे तर अतिथी म्हणून विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, सावंगी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर.सी. गोयल, महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. श्याम भुतडा, परिचारिका शिक्षण समन्वयक मनीषा मेघे, व्ही. आर. मेघे, प्राचार्य बी. डी. कुळकर्णी, परिचर्या संचालक सिस्टर टेसी सॅबेस्टियन, प्राचार्य बेबी गोयल, अधिष्ठाता वैशाली ताकसांडे, अधिपरिचारक नीरज कलहारी आदी उपस्थित होते.
याप्रसंंगी प्राचार्य बी.डी. कुळकर्णी व बेबी गोयल यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी, प्रा. सीमा सिंग व शालिनी मून यांनी बी.एससी. नर्सिंग, जनरल नर्सिंग अॅन्ड मिडवायफरी(जीएनएम) आणि आॅक्झिलरी नर्सिंग अॅन्ड मिडवायफरी (एएनएम) शाखेच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शपथ दिली.
अभ्युदय मेघे यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांकरिता मोफत आरोग्य तपासणी करण्यात येईल तसेच ज्या कुटुंबात शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत अशा कुटुंबाकरिता विनामूल्य आरोग्य सेवा देण्यात येईल, असे जाहीर केले. यावेळी, गुणवत्ताप्राप्त विद्यार्थिनींना पुरस्कार देण्यात आले. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मानसिक आरोग्य सप्ताहातील सक्रीय विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचाही प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संचालन इंदू अलवडकर व जया गवई यांनी केले तर आभार वैशाली ताकसांडे यांनी मानले.
यशस्वीतेकरिता प्रा. रंजना शर्मा, अर्चना मौर्या, नीलिमा रक्षाले, वैशाली तेंडुलकर, रुचिरा अनकर, सविता पोहेकर, मंजुषा महाकाळकर, बिबिन कुरीयन, दीपलता मेंढे, विशाल पाखरे, रोशन ठवकर, प्रतिभा वानखेडे, अख्तरी शेख, स्रेहा धनवीज, दीपाली घुंगरूड आदींनी सहकार्य केले. शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)