आंजी परिसरात खड्ड्यांची मालिका
By Admin | Updated: October 19, 2014 23:59 IST2014-10-19T23:59:05+5:302014-10-19T23:59:05+5:30
परिसरातील रस्त्यांवर सध्या खड्ड्यांची मालिका पहावयास मिळत आहे. त्यामुळे अपघात बळावले असून नागरिकांमध्ये रोष पहावयास मिळत आहे.

आंजी परिसरात खड्ड्यांची मालिका
आंजी (मो) : परिसरातील रस्त्यांवर सध्या खड्ड्यांची मालिका पहावयास मिळत आहे. त्यामुळे अपघात बळावले असून नागरिकांमध्ये रोष पहावयास मिळत आहे.
स्थानिक वार्ड क्र. १ मधील वरदळीचा गजानन साटोणे यांच्या घरापासून ते आर्वी-वर्धा राज्य मार्गापर्यंत जाणारा प्रमुख रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. राजू चामरे यांच्या घरासमोरील वळणावर मोठा खड्डा पडला असून ये जा करताना अपघात होत आहे. गावातील नागरिकांसाठी हा रस्ता महत्त्वाचा असतो. आर्वीकडे जाणारे, गर्ल्स हायस्कूल, आदर्श विद्यालय, गुड शेफर्ड प्रायमरी स्कूल, सरस्वती विद्या मंदिरमध्ये जात असलेले विद्यार्थी आणि शेतकऱ्यांची सतत वर्दळ असते. खड्ड्याचा अंदाजच येत नसल्याने धोका वाढला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे असतानाही ते दुर्लक्ष करीत असल्याने गावकरी आणि मार्गावरील प्रवासी संताप व्यक्त करीत आहे.
याच मार्गाने पुढे महाकाली देवस्थानात जाण्यासाठी नागरिकाम्ची वर्षभर गर्दी असते. तसेच सेवा येथील मारोतीच्या मंदिरातही वर्षभर भाविकांची गर्दी असल्याने या मार्गावर नेहमीच गर्दी असते. त्याचप्रमाने आंजी(मो.) येथे मोठी बाजारपेठ असल्याने परिसरातील गावांतील नागरिकाचीही येथे गर्दी असते. पर्यायाने वाहनांच्या सततच्या रहदारीने आंजी परिसरात खड्ड्यांची मालिका जीवघेणी ठरत आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वारंवार केली जात असतानाही दुर्लक्ष केले जात आहे.(वार्ताहर)