सेलूला बस थांबणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST2019-12-17T05:00:00+5:302019-12-17T05:00:21+5:30
सेलू येथे वळणमार्गावरील दोन टप्प्यांवर पूर्वी बस थांबा होता. तेव्हाही वाहक सेलूचे प्रवासी घेण्यास नकार देत होते. आता सेलूपासून दूरवर अंतरावरून नवा मार्ग सुरू झाला आहे. बहुतांश जलद बसेस सरळ मार्गे नवीन रस्त्याने धावत असल्याने सेलूला थांबण्याचा प्रश्नच येत नाही; मात्र, शुक्रवारी गोंदिया येथे जाणाºया बस मध्ये काही पासधरक विद्यार्थी बसले, याची माहिती वाहकाला असताना चालकाने ही बस सरळ नवीन मार्गाने नेल्याने तारांबळ उडाली होती.

सेलूला बस थांबणार नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : वर्धा बसस्थानकावर जेव्हा नागपूरकडे जाणारी बस फलाटावर लागते, तेव्हा सेलूला बस जाणार व थांबणार नाही अशी सूचना वाहक करीत असल्याने सेलूला जाणाऱ्या प्रवाशांना बसपासून दूर राहावे लागते. सेलूच्याव प्रवाशांकरिता केवळ जनता बस आहे का, असा प्रश्न सेलू वासीयांना पडला आहे
सेलू येथे वळणमार्गावरील दोन टप्प्यांवर पूर्वी बस थांबा होता. तेव्हाही वाहक सेलूचे प्रवासी घेण्यास नकार देत होते. आता सेलूपासून दूरवर अंतरावरून नवा मार्ग सुरू झाला आहे. बहुतांश जलद बसेस सरळ मार्गे नवीन रस्त्याने धावत असल्याने सेलूला थांबण्याचा प्रश्नच येत नाही; मात्र, शुक्रवारी गोंदिया येथे जाणाºया बस मध्ये काही पासधरक विद्यार्थी बसले, याची माहिती वाहकाला असताना चालकाने ही बस सरळ नवीन मार्गाने नेल्याने तारांबळ उडाली होती. तेव्हा वाहकाने ही बस विकास चौकासमोर नवीन रस्त्याला असलेल्या वळण मार्गावर थांबविली व तेथून सेलूच्या शेकडोवर विद्यार्थ्यांना जवळपास एक किलोमीटर अंतर पायपीट करण्याचा प्रसंग ओढवला.
जलद बसेस जुन्याच वळणमार्गावरील यशवंत व विकास चौकात याव्या म्हणून काही दिवस नवीन रस्त्यावरील चौकात शिवसेनेने ठिय्या दिला होता. हा ठिय्या बंद होताच अनेक जलद बसेस नव्या महामार्र्गाने जात असल्याने सेलू येथे उतरणाºया प्रवाशांंना अडचणीचे जात आहे. मात्र, वर्धा बसस्थानकावर वाहकाचे सेलूबाबत सूचना देणे आगार प्रमुख बंद करणार काय, असा प्रश्न प्रवाशांतून केला जात आहे. सेलूची अॅलर्जी का, असाही प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे.
सेलू येथील प्रवाशांची कुचंबणा थांबविण्यासाठी पुन्हा एकदा शिवसेना सर्व बसेस बसस्थानकावर आणण्यासाठी पुढाकार घेणार काय, याकडे लक्ष लागले आहे.