स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रम
By Admin | Updated: October 23, 2016 02:26 IST2016-10-23T02:26:50+5:302016-10-23T02:26:50+5:30
स्नेहमिलन बेरोजगार महिला बहुउद्देशीय समाजसेवी संस्था व वेदांत महिला जनजागृती शिक्षण संस्था सेवाग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने

स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रम
वर्धा : स्नेहमिलन बेरोजगार महिला बहुउद्देशीय समाजसेवी संस्था व वेदांत महिला जनजागृती शिक्षण संस्था सेवाग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने सोनेगाव (स्टेशन) येथे पाच दिवसाचे स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी बेरोजगारांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
स्वयंरोजगार महिला मेळाव्यात बांधकाम, लोहार, विमा (कायदे), शासनाच्या विविध योजना, व्यावसायिक कर्जाकरिता मार्गदर्शन करण्यात आले. यात महिलांनी आपले आयुष्य केवळ चुल व मुल यातच वाया न घालविता घराबाहेर पडून स्वत:च्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर व्हावे. स्वत: व्यवसाय सुरू करून आपल्या कुटूंबाचा, समाजाचा आणि पर्यायाने संपूर्ण देशाचा विकास, प्रगती कशी साधता येईल, याबाबत शिबिरार्थ्यांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष राखी रघाटाटे होत्या. त्यांनी प्रत्येक महिलेने ५ ते १० हजार रुपये कमविलेच पाहिजे, असे सांगितले. शिबिरात महिला, युवकांना चक्रधर कदम यांनी अगरबत्ती, धूप बत्ती, हेयर आॅईल, फिनाईल, साबनाची मेनबत्ती, लोकरीच्या विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले. प्रास्ताविक वेदांत संस्थेच्या अध्यक्ष किरण सुनारा यांनी केले. यावेळी इंदिरा मसराम, प्रमिला उईके, सावित्री भोयर, कांता शेंदे, फुलचंद कुंभेकर, सुमन बाजवे, प्रिया गुरणुले, गंगा शेंडे, यशोदा तुमाणे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. रघाटाटे यांनी बांधकाम लेबर विम्याचे महत्त्व समजावून सागत कागदपत्रांबाबत माहिती दिली.(कार्यालय प्रतिनिधी)