मनात आत्मविश्वास अन् जिभेवर साखरपेरणी

By Admin | Updated: January 3, 2015 23:06 IST2015-01-03T23:06:49+5:302015-01-03T23:06:49+5:30

शरीरयष्टी आधीपासूनच काहीशी बेताचीच. त्यामुळे खूप अवजड काम कधी जमलंच नाही. कसंबसं चौथीपर्यंत शिक्षण झालं. लहान मोठी कामं करीत असतानाच बहिणीकडून शेंगदाण्याची पापडी बनविणे शिकलो.

Self-confidence in mind and sugar plate on the tongue | मनात आत्मविश्वास अन् जिभेवर साखरपेरणी

मनात आत्मविश्वास अन् जिभेवर साखरपेरणी

रस्त्यावरचे जीवन : बोबडे पापडीवाल्याची प्रेरक कथा
पराग मगर - वर्धा
शरीरयष्टी आधीपासूनच काहीशी बेताचीच. त्यामुळे खूप अवजड काम कधी जमलंच नाही. कसंबसं चौथीपर्यंत शिक्षण झालं. लहान मोठी कामं करीत असतानाच बहिणीकडून शेंगदाण्याची पापडी बनविणे शिकलो. आणि तिच कला त्यांना बोबडे पापडीवाला अशी ओळख देऊन गेली. आयुष्यभर रस्त्यावरच गुळ व शेंगदाणा पापडी विकत सर्वांच्या जिभेवर देवराव बोबडे आजही साखर पेरणी करीत आहे. साठी पार केलेल्या बोबडे यांचा मुख्य व्यवसाय साखर व गुळाची शेंगदाणा पापडी विकणे. शासकीय रुग्णालय परिसरात रस्त्यावर ते पापडी विकतात. थोडीथोडकी नव्हे तर ३० वर्षांपासून ते हा व्यवसाय करीत आहे. आयुष्यभर पापडी विकण्याचाच व्यवसाय केला. आपण लोकांच तोंड गोड करतो याचं नेहमी समाधान असल्याचं बोबडे पापडीवाले सांगतात.
पैसा नव्हता, पण आत्मविश्वास होता
बोबडे यांच आयुष्य गरिबीतच गेलं. मेहनतीच काम जमत नसल्याने जमेल तेच काम त्यांनी केलं. पण या कामात आपण लबाडी करीत नाही, कुणाची फसवणूक करीत नाही याचं समाधान असल्याच बोबडे सांगतात. तसेच ५० पैसे छटाक पासून ७ रुपये छटाकचा प्रवास ते उलगडून सांगतात.
बोबडे पापडीवाला ओळख समाधानाची
माणसाची ओळख सहज निर्माण होत नाही. आयुष्य खर्ची घालाव लागतं. पण चविष्ट पापडी आणि दिलखुलास हास्य यामुळे बोबडे पापडीवाला ही बनलेली ओळख त्यांना आत्मिक समाधान देऊन जाते. डेहनकर लेआऊट परिसरात त्यांच नाव घेतलं तरी घरापर्यंतचा रस्ता कुणीही दाखवितं.

Web Title: Self-confidence in mind and sugar plate on the tongue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.