शेतकऱ्यांना थेट बांधावर पोहचवली बियाणे; वर्ध्यातील कृषी विभागाचे स्तुत्य नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 12:51 PM2020-06-04T12:51:57+5:302020-06-04T12:52:19+5:30

समुद्रपुर तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही बियाण्यांचा व खताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभागामार्फत खबरदारी घेतली जात आहे.

Seeds delivered directly to farmers on the farm; Commendable planning of agriculture department in Wardha | शेतकऱ्यांना थेट बांधावर पोहचवली बियाणे; वर्ध्यातील कृषी विभागाचे स्तुत्य नियोजन

शेतकऱ्यांना थेट बांधावर पोहचवली बियाणे; वर्ध्यातील कृषी विभागाचे स्तुत्य नियोजन

Next
ठळक मुद्दे३५० मे. टन रासायनिक खत व एक हजार क्विंटल बियाणे पोहचवली

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: समुद्रपुर तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही बियाण्यांचा व खताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभागामार्फत खबरदारी घेतली जात आहे. त्याकरिता समुद्रपुर तालुका कृषी अधिकारी गणेश सुर्यवंशी यांनी ३५० टन रासायनिक खत व एक हजार क्विंटल बियाणे हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून पोहचविण्याचे नियोजन केले असून त्याचा शुभारंभ उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार घोडमारे तालुका कृषी अधिकारी गणेश सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी ११ वाजता करण्यात आला.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार घोडमारे व तालुका कृषी अधिकारी गणेश सुर्यवंशी यांनी शेतकऱ्यांना सांगितले की कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही रासायनिक खतांची व बियाण्याची कमतरता भासणार नाही, शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्र्वास न ठेवू नये,तसेच बोगस बि टी, बियाण्याच्या नांदी लागून सर्वांची फसगत करून घेऊ नका असे आवाहन तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य रवी दांडेकर , वनाशीष कंपनीचे नितीन वंदिले, कृषी पयेर्वेक्षक प्रशांत राऊत व सहायक औदुंबर देवकाते आत्मा बीटीम राजेश चांदेवार सह शेतकरी उपस्थित होते.
ज्या शेतकऱ्यांच्या बांधावर थेट बियाणे खते पोहोचली तर यांनी कृषि विभागाच्या या उपक्रमाचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Seeds delivered directly to farmers on the farm; Commendable planning of agriculture department in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती