शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनच्या ३२९ तक्रारींत बियाणे सदोष; कंपनीवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 17:02 IST

शेतकऱ्यांना ४.८५ लाखांची नुकसान भरपाई

वर्धा : खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत प्राप्त ५३० तक्रारीपैकी ३२९ तक्रारीमध्ये बियाण्यात दोष असल्याचे आढळून आल्यामुळे ईगल सिड्स प्रायव्हेट लिमिटेड या इंदोर येथील कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ११७ शेतकºयांना १८९ बॅग सोयाबीन बियाणे वितरण करून  ४ लाख ८५ हजार ७५०  रुपये नुकसान भरपाई म्हणून कंपनीने अदा केल्याची माहिती जि.प. कृषी विकास अधिकारी अभयकुमार चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात बोगस बियाण्यांच्या ५३० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषगाने तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने प्राप्त तक्रारीची तपासणी करुन पंचनामे केले. त्यापैकी एकूण ३२९ तक्रारींमध्ये  तालुकास्तरीय समीतीच्या तपासणीत बियाणे सदोष आढळुन आले.  त्याअनुषंगाने बियाणे सदोष असल्यामुळे ईगल सिड्स प्रा. लि. इंदोर या कंपनीवर हिंगणघाट कृषी अधिकारी यांनी ३ जुलैला गुन्हा दाखल केला आहे. शिवाय फौजदारी कार्यवाही सध्या सुरु आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत गुणनियंत्रण निरिक्षकामार्फत खरीप हंगामामध्ये आतापर्यंत बियाणे ४५२, रासायनिक खते ३१५ व किटकनाशक २६५ कृषी केद्रांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या वेळेस आढळुन आलेल्या त्रुटीच्या अनुषगाने बियाणे ४७, रासायनिक खते १७, व किटकनाशक ६  अशा एकूण ७० कृषी केंद्रांना विक्रीबंद आदेश देण्यात आला. तसेच शासनामार्फत जि.प. कृषी विभागाला अप्रमाणित बियाणे २७०, कीटकनाशके ४९ व रासायनिक खतांचे १९२ नमुने घेण्याचा लक्षांक देण्यात आला होता. त्याअनुषंगाने आतापर्यंत बियाणे-१६९, रासायनिक खते-१२२ व किटकनाशक १८ नमुने घेवुन विश्लेषणाकरिता पाठविण्यात आले आहे.

विश्लेषणाचे अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये बियाणे-१० नमुने, रासायनिक खते-७ नमुने अप्रमाणीत घोषित झाले. याबाबत ६ कंपनी व ६ कृषी केंद्रांवर न्यायालयीन खटला दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच पंचायत समिती सेलु अंतर्गत केळझर येथे बोगस बिटी बियाणे सापडल्याने पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांनी संबधीतावर २० जूनला गुन्हा दाखल  केला आहे. कृषी विभाग व जिल्हा परिषदच्या भरारी पथकाने बोगस खत, बियाणे सापडल्याने संयुक्त कार्यवाही करुन २१ जूनला  संबधीतावर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार