वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवी सुरक्षित
By Admin | Updated: June 8, 2016 01:42 IST2016-06-08T01:42:35+5:302016-06-08T01:42:35+5:30
जिल्हा मध्यवर्ती बँकेवर रिझर्व्ह बँकेनी लावलेली निर्बंध मागे घेवून २ मे रोजी बँकींग परवाना परत केला. यामुळे बँक पुढील

वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवी सुरक्षित
वर्धा : जिल्हा मध्यवर्ती बँकेवर रिझर्व्ह बँकेनी लावलेली निर्बंध मागे घेवून २ मे रोजी बँकींग परवाना परत केला. यामुळे बँक पुढील व्यवसाय सुरू करण्यास पात्र झालेली आहे. बँकेच्या प्राधिकृत समिती सभेने बँकेच्या आर्थिक स्थितीचा १ जून रोजी आढावा घेऊन बँकींग व्यवहार सुरू करण्यासाठी धोरण ठरविल्याची माहिती वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापकाने कळविली आहे.
बँकेतील ठेवीबाबत अनेकांची चिंता कायमच होती. त्यांची ही चिंता कमी करण्याचा बँकेचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे. वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेत ठेवीदाराच्या ठेवी सुरक्षित असून ठेवी परत करण्यासंदर्भात आवश्यक धोरण ठरविण्यात आले आहे. सर्व ठेवीदारांना त्यांच्या ठेवीवर व्याज आकरणी करण्यात येत असल्याचेही त्यांच्याकडून कळविण्यात आले आहे.
बँकेचे व्यवहार गत दोन वर्षांपासून पूर्णत: बंद असल्यामुळे बहुतांश मुदती ठेवीची ड्यूट डेट संपलेली आहे. तसेच त्यांचे नुतणीकरण करता आले नाही. अशा ठेवींवर ड्यू डेटपासून आज पर्यंतच्या कालावधीकरिता निर्धारित व्याजदाराने किंवा ठेवीचे ड्यू डेट झाल्यापासून जो कालावधी झाला असेल त्या कालावधीसाठी मुदती ठेवीचा व्याजदर या दोन पैकी जो जो कमी असेल त्या दराने व्याज आकारून नुतणीकरण करण्यात येणार आहे. यापुढे सुधारित व्याजदराने त्याचे नुतणीकरण करण्यात येणार आहे. ठेवीदाराचे हित सुरक्षित राहील व त्यांच्या ठेवीवरील व्याजावरचेही नुकसान होणार नाही.
ठेवीदारांकडे कोणत्याही प्रकारचे तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे थकित कर्ज असल्यास ठेवीची रक्कम त्यांच्या कर्जात वळती करण्यात येणार आहे. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींकडे असलेल्या बँक कर्जाच्या वसुलीपोटी ठेवीदारांच्या संमतीने बँकेत असलेल्या ठेवीची रक्कम वळती करून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घेता येईल. असे करताना मात्र इतरांच्या कर्ज खात्यावर ठेवीची रक्कम वळविता येणार नाही.
बँकेचे व्यवहार बंद असल्यामुळे मंजूर कर्ज मर्यादेवर व्यवहार होऊ न शकल्याने कर्ज थकित झालेले आहे. अशा कर्जदारांकडून घेणे असलेल्या रक्कमेसह ड्यू झालेल्या व्याजाचा भरणा करून त्यांचे कर्ज खात्यांचे नुतनीकरण करण्यात येणार असल्याचे वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापकाने कळविले आहे.(प्रतिनिधी)
बँकेचे नवे धोरण
४मुदती ठेवी, चालू खाते व बचत खात्याबाबत कोणत्याही ठेवीदाराला त्यांच्या मुदत ठेवीची रक्कम मुदतपूर्व, मुदतीनंतर सद्यस्थितीत किमान एक वर्ष परत करता येणार नाही. फक्त वैयक्तिक खातेदारांना बचत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजाची उचल ५० टक्के प्रमाणे तिमाही अदा करण्यात येईल. चालू खात्यावर तथा बचत खात्यावर जुन्या बाकीतून रक्कम काढता येणार नाही. ही कारवाई १ जुलै पासून सुरू करण्यात येणार आहे. नागरी बँक व सोसायटीचे मुदती ठेवीचे ड्यू डेटपर्यंत व्याजाची रक्कम त्याचे बचत ठेव, चालू ठेव खात्यात जमा करण्यात येईल; परंतु व्याजाची रक्कम उचल करता येणार नसल्याचे धोरण ठरविण्यात आले आहे.