‘त्या’ हत्यांकाडातील दगडाचा शोध सुरू
By Admin | Updated: March 8, 2015 01:49 IST2015-03-08T01:49:40+5:302015-03-08T01:49:40+5:30
तालुक्यातील देऊरवाडा येथे झालेल्या सचिन हेपट हत्या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली. आरोपींनी दगडाने ठेचून त्याची हत्या केली ...

‘त्या’ हत्यांकाडातील दगडाचा शोध सुरू
आर्वी : तालुक्यातील देऊरवाडा येथे झालेल्या सचिन हेपट हत्या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली. आरोपींनी दगडाने ठेचून त्याची हत्या केली असून तो दगड बाकळी नदीत फेकल्याचे कबुल केले. मारेकऱ्यांनी वापरलेल्या त्या दगडाचा शोध नांदपूर येथील बाकळी नदीत पोलीस घेत आहे़
यवतमाळ येथील सचिन हेपट याचा मित्राशी झालेल्या वादातून मित्रानेच काटा काढल्याची घटना गत आठवड्यात तालुक्यात घडली़ सचिनची देऊरवाडा गावालगत असलेल्या नाल्याजवळ दगडाने मारून हत्या केल्याचे या दोघांनी पोलिसांना दिलेल्या बयानात कबूल केले आहे. मात्र तो दगड गावात परत येताना बाकळी नदीत फेकल्याचे सांगितले. प्रभारी ठाणेदार वाय़एस़ थोटे, सहायक सुरेंद्र कोहळे, नितीन रायलवार यांच्याकडून दगडाचा शोध सुरू आहे. शनिवारी धुर्वे बंधूंना आर्वी न्यायालयात हजर केल्याची माहिती तपास अधिकारी थोटे यांनी दिली़ सचिनची हत्या केल्यानंतर समीर धुर्वे याने त्याची दुचाकी पुलगाव बसस्थानकावर नेऊन ठेवल्याची कबुली दिली़ (तालुका प्रतिनिधी)