मालमत्ता कर न भरल्याने लावले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:16 IST2019-03-12T22:15:33+5:302019-03-12T22:16:33+5:30
२०१८-१९ हे आर्थिक वर्ष संपत आहे. परंतु, अद्याप अनेक मालमत्ताधारकांनी न.प.चा मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही. वारंवार स्मरण देऊनही मालमत्ता कर न भरणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम न.प.प्रशासनाने सुरू केली असून मंगळवारी कर न भरणाऱ्या काही नागरिकांच्या मालमत्तेला न.प. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सील लावले.

मालमत्ता कर न भरल्याने लावले सील
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : २०१८-१९ हे आर्थिक वर्ष संपत आहे. परंतु, अद्याप अनेक मालमत्ताधारकांनी न.प.चा मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही. वारंवार स्मरण देऊनही मालमत्ता कर न भरणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम न.प.प्रशासनाने सुरू केली असून मंगळवारी कर न भरणाऱ्या काही नागरिकांच्या मालमत्तेला न.प. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सील लावले.
सूचना देऊनही कराचा भरणा न केल्यामुळे सतीश गोकुलदास राठी यांच्या मालमत्तेला सील लावण्यात आली आहे. शिवाय वॉर्ड क्र. १८ मधील मीरा दत्तात्रय पेंडसे, वॉर्ड क्र. २३ मधील गुलाब संभाजी चौधरी व वामन रामजी कडू यांच्याविरुद्ध जप्तीची कारवाई करून त्यांच्या मालमत्तेला सील लावण्यात आले आहे. ही कारवाई न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, न.प. प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर यांच्या मार्गादर्शनात वर्धा न.प.चे बिराजदार, अविनाश मरघडे, मुक्कीम शेख, प्रदीप मुनघाटे, आशीष गायकवाड, चंदन महत्वाने यांनी केली. वर्धा नगरपालिकेच्यावतीने होणाºया कठोर कारवाईपासून बचावासाठी नागरिकांनी न.प.चा मालमत्ता कर वेळीच भरावा, असे आवाहन कर विभागाचे प्रमुख जगताप यांनी केले आहे.