खादी आयोगाच्या विरोधावर शिक्कामोर्तब

By Admin | Updated: September 19, 2016 00:45 IST2016-09-19T00:45:32+5:302016-09-19T00:45:32+5:30

देशातील खादी संस्थांवर खादी ग्रामोद्योग आयोगाने विविध करांची आकारणी केली आहे. यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे.

Sealed against the Khadi Commission | खादी आयोगाच्या विरोधावर शिक्कामोर्तब

खादी आयोगाच्या विरोधावर शिक्कामोर्तब

खादी सभेतील ठराव : सर्व कार्यक्रम सरकारी व्यवस्थेपासून दूर ठेवणार
सेवाग्राम : देशातील खादी संस्थांवर खादी ग्रामोद्योग आयोगाने विविध करांची आकारणी केली आहे. यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. एमडीएची राशी परत मिळविण्यासाठी स्टॅम्प पेपरवर करारनामा करण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. शिवाय आयोगाच्या अन्यायपूर्ण नितीवर खादी संस्थांनी नाराजी जाहीर करून आयोगाला विरोध करण्याचा ठराव यावेळी पारीत केला. या ठरावाला सर्वांनी एकमताने संमती दिली.
यासह संत विनोबांचा ब्रह्मनिर्वाण दिनापासून खादी संस्था आयोगाच्या विरुद्ध पावले उचलणार. यात स्थायी समाधान न झाल्यास खादी व ग्रामोद्योग आयोगाचे प्रमाणपत्र परत करण्यात येईल, असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे.
सेवाग्राम येथील नई तालीम समिती परिसरातील शांती भवनमध्ये खादी सभा आयोजित करण्यात आली होती. तीन दिवसीय या सभेचा रविवारी समारोप झाला. या तीन दिवसात येथे विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी खादी विचारांच्या माध्यमातून गावात रचनात्मक कार्याचे पुनर्गठन करण्याबाबतही चर्चा झाली. यातील सर्व कार्यांना मात्र सरकारी व्यवस्थेपासून मुक्त ठेवण्याबाबतही विचारमंथन करण्यात आले.
देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या खादी संस्थाच्या प्रतिनिधींनी यावेळी सविस्तर चर्चा करून येणाऱ्या विविध अटींवर चर्चा केली. या तीन दिवसाच्या विचार मंथनातून तयार केलेला प्रस्ताव सर्वांना पाठविल्या जाणार असल्याचे खादी मिशनचे संयोजक बालभाई यांनी समारोप प्रसंगी सांगितले.
प्रस्ताव तयार करण्यासाठी मणू मेहता, पुष्पेंद्र दुबे, डॉ. विभा गुप्ता, लोकेंद्र भारती, अलिका सिंग, ब्रह्मानंद, कृष्णस्वामी यांनी सहयोग केले. संचालन पुष्पेंद्र दुबे यांनी केले. समारोप सत्राचा प्रारंभ लोकेंद्र भारती यांच्या ‘मैली चादर ओढके’ या भजनाने तर सांगता शांती मंत्राने झाली. (वार्ताहर)

Web Title: Sealed against the Khadi Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.