बसेसला भोंदूबाबांच्या जाहिरातींचे आच्छादन

By Admin | Updated: September 30, 2015 05:44 IST2015-09-30T05:44:50+5:302015-09-30T05:44:50+5:30

अंधश्रद्धेला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू केला; पण अनेक भोंदुबाबा समस्या दूर

Screening of busses for busses | बसेसला भोंदूबाबांच्या जाहिरातींचे आच्छादन

बसेसला भोंदूबाबांच्या जाहिरातींचे आच्छादन

वर्धा : अंधश्रद्धेला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू केला; पण अनेक भोंदुबाबा समस्या दूर करण्याच्या नावाखाली नागरिकांना फसवू पाहत आहेत. यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात असल्याचे बसेसमध्ये सर्वत्र चिपकवून असलेल्या पत्रकांवरून दिसून येते.
दैनंदिन जीवनातील दगदग आणि अडचणींमुळे सामान्य नागरिक वैतागलेले असतात. आपली समस्या दूर व्हावी, अशी त्यांची स्वाभाविक अपेक्षा असते. त्यामुळे त्यांच्या अवस्थेचा आणि श्रद्धेचा उपयोग करीत या समस्या जादूटोण्याद्वारे सोडविण्याचा दावा करणारे अनेक भामटे सर्वत्र आपली दुकाने मांडून बसली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायद्याचा वचक निर्माण करण्यात आला आहे; पण त्यालाही न जुमानता चुटकीसरशी कोणतीही समस्या दूर करण्याचा दावा करण्याच्या जाहिराती केल्या जात आहे. एसटी बसेसमध्ये सामान्य नागरिक प्रवास करीत असतात. यातील बरेच नागरिकही भोळसट असतात. त्यांच्या याच भोळेपणाचा फायदा घेत अशा भोंदूबाबांद्वारे बसेसमध्ये जाहिराती लावल्या जात आहेत. काही काळात त्याचे प्रमाण वाढून संपूर्ण बसेसच जाहिरातींना आच्छादून गेल्याचे दिसते.
ही बाब शहरातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना निदर्शनास येताच त्यांनी ही पत्रके काढून जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या लक्षात आणून दिले. या प्रकारावर आळा घालत भोंदूबाबांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली.(शहर प्रतिनिधी)

४बहुतेक नागरिक हे दैनंदिन कटकटी आणि आर्थिक अडचणींनी त्रस्त असतात. यातील अनेक युवक हे बेरोजगारीनेही त्रस्त असतात. अशावेळी सदर पोस्टर्स नजरेस पडल्यास त्याकडे ओढा वाढून त्यावर दिलेल्या क्रमांकावर फोन करून जाळ्यात ओढले जाते. बरेचदा असे भोंदूबाबा त्यांना वेगवेगळ्या शहरात बोलवून लुबाडत असल्याचेही ऐकिवात आहे.

देशभर जाळे सक्रिय
४महामंडळाच्या बसेस या राज्यासह देशातील इतरही राज्यांत धावत असतात. त्यामुळे ही पोस्टर्स बसेसमध्ये लावल्यास ती देशभर पोहोचतात. यातील जाहिरातींवर कुठेही नाव आणि पत्ता न देता ठळक अक्षरात मोबाईल क्रमांक दिलेला असतो. तो क्रमांकही इतर राज्यातला असल्याचे निदर्शनास येते.

किळस आणणाऱ्या जाहिराती
४यातील काही जाहिराती तर किळस आणणाऱ्या आहेत. तुमच्या शत्रूला काही वेळातच संपविण्याचा दावा करण्यात येत असल्याचा ओंगळवाणा प्रकारही पाहावयास मिळतो. त्यामुळे अंधश्रद्धेचा फास अद्यापही घट्टच असल्याचे प्रत्ययास येते.

महामंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष
४केवळ एकाच आगाराच्या बसेसमध्ये सदर फसवणुकीच्या जाहिराती लावलेल्या नाहीत तर राज्यातील सर्वच आगाराच्या प्रत्येक बसेसमध्ये एक तरी पोस्टर पाहावयास मिळते. एवढेच नव्हे तर इतरही अश्लील जाहिरातींचा बसेसमध्ये भरणा असतो. याकडे सर्वच आगारांचे दुर्लक्ष होत असल्याने सामान्य नागरिक संताप व्यक्त करीत आहे.

Web Title: Screening of busses for busses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.