विविध स्पर्धांतून विद्यार्थ्यांत विज्ञानाविषयक जागृती

By Admin | Updated: February 27, 2017 00:40 IST2017-02-27T00:40:26+5:302017-02-27T00:40:26+5:30

मराठी विज्ञान परिषद आर्वी विभागातर्फे मॉडेल हायस्कूल आर्वी येथे राष्ट्रीय विज्ञानदिन उपक्रम २०१७ अंतर्गत विविध स्पर्धा पार पडल्या.

Science awakening among students from various competitions | विविध स्पर्धांतून विद्यार्थ्यांत विज्ञानाविषयक जागृती

विविध स्पर्धांतून विद्यार्थ्यांत विज्ञानाविषयक जागृती

मराठी विज्ञान परिषदेचा उपक्रम
आर्वी : मराठी विज्ञान परिषद आर्वी विभागातर्फे मॉडेल हायस्कूल आर्वी येथे राष्ट्रीय विज्ञानदिन उपक्रम २०१७ अंतर्गत विविध स्पर्धा पार पडल्या. या उपक्रमाच्या माध्यमातून विज्ञान व वैद्यानिक दृष्टीकोणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
विज्ञान प्रात्यक्षिक सत्र या उपक्रमात आर्वी विभागातील नऊ विद्यालयातील सहावी ते नववीचे ४० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी ४० प्रात्याक्षिकांद्वारे विज्ञानातील विविध संकल्पना स्पष्ट केल्या. गणित प्रात्यक्षिक सत्र या उपक्रमात ९ विद्यालयाचे सहावी ते नववीचे ३५ विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी छोट्या-छोट्या गणितीय साधनांद्वारे गणितीय संकल्पना स्पष्ट केली. विज्ञान-गणित प्रश्नमंजुषा या उपक्रमात नऊ गटांनी सहभाग घेतला. यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित यावर प्रत्येकी १० प्रश्न विचारण्यात आले. यानंतर पाच प्रश्नांचा तेज राऊंड घेण्यात आला. या उपक्रमातील २२ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञानदिनी गौरविण्यात येणार आहे. संचालन सुनीता कदम यांनी तर आभार चारभे यांनी मानले. कार्यक्रमाला प्राचार्य अभय दर्भे, पर्यवेक्षक दीपक खोंडे, सुनीता कदम, नित्यानंद कोल्हे, करुणा सराफ, प्रेमकुमार चोपडे, जयश्री घोटकर, गजानन मेटकर, आशीष देशमुख, लोखंडे, निनावे, झटाले, चारभे, ढोले, बिजवे, आपकाजे, विलास गिरी, केंढे, मानकर, महाजन, चौधरी आदींची उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Science awakening among students from various competitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.