नागरिक घडविण्यासाठी शाळा संस्कारक्षम हव्या!

By Admin | Updated: December 16, 2015 02:16 IST2015-12-16T02:16:45+5:302015-12-16T02:16:45+5:30

देश घडविण्यासाठी उत्तम नागरिकांची गरज असते. शाळा संस्कारमय करण्याकडे विशेष लक्ष याच कारणांनी द्यावे लागते.

Schools should be educated for making citizens! | नागरिक घडविण्यासाठी शाळा संस्कारक्षम हव्या!

नागरिक घडविण्यासाठी शाळा संस्कारक्षम हव्या!

जयवंत मठकर : सेवाग्राम आश्रम व जि.प.तर्फे कथाकथन प्रशिक्षण शिबिर
सेवाग्राम : देश घडविण्यासाठी उत्तम नागरिकांची गरज असते. शाळा संस्कारमय करण्याकडे विशेष लक्ष याच कारणांनी द्यावे लागते. संस्थेनी प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असून शिबिर हा यातीलच एक भाग आहे, असे विचार सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठाणचे अध्यक्ष जयवंत मठकर यांनी व्यक्त केले.
आश्रम परिसरात प्राथमिक शिक्षकांसाठी कथाकथन प्रशिक्षण शिबिर जयवंत मठकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. शिबिराचे उद्घाटन जि. प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्राथमिक शिक्षाधिकारी धनराज तेलंग, मार्गदर्शक प्रा. डॉ. दिलीप गरुड, मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव व अधीक्षक भावेष चव्हाण यावेळी उपस्थित होते.
मिलिंद भेंडे म्हणाले, जि. प. शाळेच्या शिक्षकांसाठी असलेला कथाकथनाचा उपक्रम नाविण्यपूर्ण आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेचा घटक असल्याने कथेच्या माध्यमातून संस्कार शाळेविषयी आणि विषयाबाबत गोडी निर्माण होवू शकते. कथेतून अपेक्षित परिणाम साध्य करता येतो असेही ते म्हणाले. तसेच हे तंत्र विद्यार्थ्यांसाठी अतिशय सोपे असल्याचेही त्यांनी सांगितले.
तेलंग म्हणाले, आश्रम व जि.प. यांच्या विद्यमाने शिबिराचे आयोजन करून शिक्षकांना चांगली संधी निर्माण करून दिली आहे. कथाकथन तंत्राचे कौशल्य आत्मसात करून विद्यार्थ्यांना लाभांवित करावे.
श्रीराम जाधव म्हणाले, सेवाग्राम ही गांधीजींची कर्मभूमी आहे. स्वतंत्र्य चळवळीचे रचनात्मक कार्य याच भूमितून करून देशाला स्वातंत्र्य आणि उपक्रमाची देण दिली. हा उपक्रमही शिक्षण क्षेत्रात नवी क्रांती घडवेल असे ते यावेळी म्हणाले. प्रा. दिलीप गरुड यांंनी कथाकथन कसे करावे, याविषयाची मांडणी, अध्ययन, टिपणे, समयसूचकता, सराव, प्रसंग, थोरा मोठ्यांची माहिती इ. वर माहिती देवून मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व संचालन भावेष चव्हाण यांनी केले. राजू चौरेवार, चंद्रशेखर कोकटे, सवाती नगराळे यांनी कथाकथन प्रशिक्षण अनुभव कथन केले. यात्री निवास मध्ये प्रा. डॉ. दिलीप गरुड यांच्या गावातील लहान मुलांसाठी कथाकथनाचा कार्यक्रम झाला. या प्रसंगी जयवंत मठकर, प्रा. डॉ. श्रीराम जाधव, दारुबंदी महिला मंडळ व तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष गीता कुमरे व पंचफुला सहारे उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी रुपेश कडू यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.(वार्ताहर)

Web Title: Schools should be educated for making citizens!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.