शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

विद्यालय, उच्चशिक्षण संपविण्यासाठी आंतरराष्ट्रीय भांडवलदारांचा दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 21:48 IST

आज देशातील शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. सरकारला संविधानावर आधारित व्यवस्थाच नाकारायची आहे. शिक्षणाचे खासगीकरण करण्यात येत असून मोठ्या प्रमाणात शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे.

ठळक मुद्देपत्रपरिषदेत सदगोपाल यांचा आरोप : शांती भवनात तीन दिवस बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : आज देशातील शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. सरकारला संविधानावर आधारित व्यवस्थाच नाकारायची आहे. शिक्षणाचे खासगीकरण करण्यात येत असून मोठ्या प्रमाणात शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे. विद्यालय तथा उच्चशिक्षण संपविण्यासाठी आंतरराष्ट्रीय भांडवलदारांचा दबाव असल्याचा आरोप दिल्ली विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता प्रा. अनिल सद्गोपाल यांनी केला.नई तालीम समिती परिसरातील शांती भवनात १६ ते १८ फेबु्रवारीपर्यंत अखिल भारत शिक्षा अधिकार मंचच्या पाचव्या राष्ट्रीय परिषद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. बैठकीला २२ राज्यांतील ७५ विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रा. सद्गोपाल पूढे म्हणाले की, देशातील सामान्य आणि मागासवर्गीय वर्गाची संख्या ८५ टक्के आहे. सरकारने शाळा व उच्चशिक्षण बंद केल्यास याचा सरळ फटका या ८५ टक्के लोकांच्या पाल्यांना बसणार आहे. ते सर्व शिक्षणापासून वंचित राहतील. शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण झाल्याने मुठभर लोकांचेच त्यावर नियंत्रण राहणार असून ते शिक्षण घेऊन विकास साधतील; पण यात राष्ट्राचा विकास नसून अद्योगतीकडे राष्ट्र जाऊन विषमतेची दरी निर्माण होणार आहे. जाती व्यवस्था प्रदर्शने वाढतील. यात संविधानाने जो हक्क दिला, तोच नाकारण्यात येत असून एनडीएचे सरकार संविधानच नाकारत असल्याने धोका वाढला आहे.प्रा. जी. हरगोपाल म्हणाले की, संविधानाने अधिकार, हक्क दिलेले आहेत. संविधानाच्या मूल्यांना आपण समजून घेण्याची वेळ आलेली आहे. सरकार व आरएसएसच्या धोरणाचे संकट असल्याने विकासाचे सुत्र असलेले शिक्षण हिरावून घेण्याचे षडयंत्र रचले जात आहे. यात शासनासोबतच भांडवलदारांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. लोकांनी संकट समजून घेत २०१९ मध्ये निर्णय घेण्याची वेळ आली आहे.प्रा. मधुप्रसाद म्हणाल्या की, देश -विदेशातील भांडवलदारांना बाजार काबीज करायचा आहे. त्यांनी शिक्षण, पाणी, आरोग्य यावर कब्जा केला. कदाचित भविष्यात हवेवरही अधिकार दाखवतील. मग, सामान्यांचे काय, हा प्रश्नच आहे. न्यायासाठी आवाज उठविणाºयांना शासन देशद्रोही ठरत आहे. यावरून संविधान नाकारून मुठभर लोक मनुवादी व हिंदुत्ववादी व्यवस्था कायम करीत असल्याचे दिसते. यात हिंदुनाही जाब विचारण्याचा अधिकार राहील काय, असा प्रश्नही त्यांनी केला.पत्रपरिषदेला प्रा. विकास गुप्ता, प्रा. आनंद तेलतुंबडे उपस्थित होते. तीन दिवसीय बैठकीत लोकेश मालती प्रकाश, रमेश पटनायक, डॉ. एम. गंगाधर व देशभरातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत प्रतिनिधी सहभागी झाले होते.