सहा शहरात स्कूल बसचे थांबे निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 11:43 PM2019-08-09T23:43:22+5:302019-08-09T23:43:56+5:30

स्कूल व्हॅन व बसने ये-जा करणाऱ्या प्रत्येक शाळकरी मुला-मुलीची सुरक्षा हा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन उपप्रादेशिक परिवहन विभागाने वर्धा शहरासह कारंजा (घा.), आष्टी, सेलू, समुद्रपूर व हिंगणघाट शहरात स्कूल बस व व्हॅनचे थांबे निश्चित केले आहे.

School bus stops fixed in six cities | सहा शहरात स्कूल बसचे थांबे निश्चित

सहा शहरात स्कूल बसचे थांबे निश्चित

Next
ठळक मुद्देइतर ठिकाणी वाहन उभी केल्यास होणार कारवाई : स्थानिक स्वराज्य संस्थांवर निश्चित केली जबाबदारी

महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्कूल व्हॅन व बसने ये-जा करणाऱ्या प्रत्येक शाळकरी मुला-मुलीची सुरक्षा हा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन उपप्रादेशिक परिवहन विभागाने वर्धा शहरासह कारंजा (घा.), आष्टी, सेलू, समुद्रपूर व हिंगणघाट शहरात स्कूल बस व व्हॅनचे थांबे निश्चित केले आहे. या थांब्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी स्कूल व्हॅन व बस उभी केल्यास त्या बसचालकावर कारवाई करण्यात येणार आहे. थांबे निश्चित करण्याची ही प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने हे थांबे निश्चित करण्यात आले आहे. वर्धा शहरासाठी एकूण ५० थांबे निश्चित करण्यात आले आहे. तर हिंगणघाट शहरात विविध ठिकाणी १६, कारंजा (घा.) शहरात १३, समुद्रपूर शहरात ८, आष्टी शहरात ५ तर सेलू शहरात ८ थांबे निश्चित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या थांब्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची जबाबदारी नगरपंचायत व नगरपालिकांवर देण्यात आली आहे. तर वर्धा शहराच्या व जिल्ह्याच्या दृष्टीने न.प. किंवा वाहतूक विभाग यांच्याकडून स्कूल बस तसेच स्कूल व्हॅनचे थांबे वाहतुकीच्या सुविधेनुसार बदलविण्यासाठी किमान ३ दिवसांची पूर्व सूचना देण्यात येणार आहे.
सदर थांब्यावर कोणत्याही वाहनास एका वेळेस ५ मिनीटांच्यावर थांबता येणार नाही. शिवाय सदर थांब्यांबाबत सूचना फलक लावण्याची जबाबदारी त्या-त्या न.प.व नगरपंचायतची राहणार आहे. सदर थांब्यांवर वारंवार हॉर्न वाजविणाºयावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

समुद्रपूर शहरातील थांबे
समुद्रपूर शहरात एकूण आठ थांबे निश्चित करण्यात आले आहे. त्यात संस्कार ज्ञानपीठ ज्यूनिअर कॉलेज, लोहकरे ले-आऊट मधील मोकळी जागा, भालकर वॉर्डात कास्तूलवार यांच्या घराजवळ, हनुमान मंदिर जवळ, डॉ. आंबेडकर वॉर्डात बुद्ध विहार समोर, वॉर्ड ११ मध्ये मारोती मंदिर पोस्ट आॅफिस जवळ, मास्टर कॉलनीत वासेकर यांच्या घराजवळ, माऊंट कारमेल कान्व्हेंट यांचा समावेश आहे.
कारंजा शहरातील थांबे
जुनी नगरपंचायत इमारत, जयस्तंभ चौक, आठवडी बाजार चौक, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती कार्यालयासमोर, गजानन महाराज मंदिर जवळ, बिहारी रोड, वॉर्ड ८ येथे यावले यांच्या घरासमोर, चरडे मंगल कार्यालयाजवळ, गोकुळ सिटी जवळ, बाजार समितीजवळ, शिक्षक कॉलनीत खडतकर मंगल कार्यालयासमोर, वॉर्ड १६ मध्ये दिग्रसे यांच्या घरासमोर स्कूल व्हॅन किंवा बस थांबविता येणार आहे.
सेलू शहरातील थांबे
येथील गुड शेफर्ड स्कूल, यशवंत विद्यालय, शारदा ज्ञानमंदिर विद्यालय, स्कूल आॅफ ब्रिलियन्ट, दीपचंद चौधरी स्कूल, चन्नावार विद्यामंदिर येळाकेळी, किनकर स्कूल, दिनकर विद्यामंदिर व श्रीकृष्णा हायस्कूल जामणी शाळेच्या आवारातील जागा येथे स्कूल बस व व्हॅन थांबविता येणार आहे.
हिंगणघाट शहरातील थांबे
निखाडे मंगल कार्यालयाजवळ, स्रेहदीप कॉन्व्हेंट जवळ, मोहता पार्क जवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय समोर, कलोडे भवन समोर, पिंपळगाव रोडवरील शासकीय वसाहत समोर, यशवंतनगरातील झाशी राणी चौक, रिठे सभागृहाजवळ, टाका मैदान प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गीता मंदिर समोर (केवळ ७ अधिक १ स्कूल व्हॅन करिता, कारंजा चौक कोठारी भवन समोर, मानधने हॉस्पिटल समोर, तुकडोजी पुतळा गुरूदेव सेवा मंडळ समोर, सेंट जॉन कॉन्व्हेंट, भारतीय विद्या भवन, मोहता स्कूल अशी हिंगणघाट येथे थांबे निश्चित करण्यात आली आहेत.
आष्टी शहरातील थांबे
आष्टी शहरात एकूण पाच थांबे निश्चित करण्यात आले असून त्यात जुने बस स्थानक, नवीन बस स्थानक, बँक आॅफ इंडिया समोर, समर्थ वाचनालय व प्राथमिक उर्दू शाळा यांचा समावेश आहे.
वर्धा शहरातील थांबे
आर्वी नाका येथे रस्त्याच्या पश्चिम दिशेस तिडके यांचे दुकानासमोर, बॅचलर रोड येथे पावडे नर्सिंग होम समोर, शिववैभव समोर, मगन संग्रहालय समोर, डॉ. कश्यप यांच्या दवाखान्यासमोर, जेल रोडवर दप्तगे यांच्या घरासमोर, झाशी राणी चौक बी.एस.एन.एल. कार्यालयासमोर, सिव्हील लाईन येथे पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यासमोर, ट्रेझरी आॅफिस समोर, कॉमर्स कॉलेज, विकास भवन समोर, वर्धा-सेवाग्राम मार्गावर अदलखिया कॉम्पलेक्स समोर, बमनोटे यांच्या दुकानाजवळील हनुमान मंदिर समोर, लक्ष्मीनगरात सावित्रीबाई फुले बगीचा समोर, नायडू ले-आऊट येथे खरे यांच्या घरासमोर, व्हीआयपी मार्गावर भित्रे यांच्या घरासमोर, बजाज चौक ते आर्वी नाका या मार्गावर बढे चौक, शिवाजी चौक, महाराष्ट्र बँकेसमोर, शिवाजी चौक ते धुनिवाले मठ चौक या मार्गावर केसरीमल कन्या शाळेसमोर, दादाजी धुनिवाले मठ राऊत यांच्या घरासमोर, म्हाडा कॉलनी मार्गावर हॉटेल मराठा, प्रतापनगर इंदिरा उद्यान, मानसमंदिर चौधरी यांच्या घरासमोर, गजानननगर येथे ज्ञानेश्वर मंदिरासमोर, म्हाडा कॉलनीत म्हाडा चौकात, साईनगर येथे मेघे यांच्या घरासमोर, रामनगर येथे अग्निहोत्री कॉलेज समोर, तुकाराम मंदिर समोर, पद्मावती मंदिर समोर, भगतसिंग चौक, राठी गॅस एजन्सी समोर, पॅथर चौक, पोद्दार बगीचा परिसरात तडस यांच्या घरासमोर, वर्धा-यवतमाळ मार्गावर दयालनगर चौक, शिवाजी शाळा स्टेशनफैल, वर्धा-हिंगणघाट मार्गावर महावीर कॉम्पलेक्स समोर, बॅचलर रोडवर बॉडी जिम समोर, वसंत शाळेसमोर, गांधीनगरात श्रीराम मंदिर समोर, यशवंत कॉलनी, तुळशी वृंदावन समोर, अशोकनगर येथे बेअर हाऊसमोर, दयालनगर येथे सावरकर यांच्या घरासमोर, पुलफैल येथे लाला लचपत रॉय शाळेसमोर, पुलफैलात बुद्धविहारासमोर, गोकुलधाम येथे श्रीनिवास कॉलीनी चौक, रामनगर येथे बत्रा यांच्या घरासमोर, हवालदारपुरा येथे कांपीवार यांच्या घरासमोर, मालगुजारीपुरा येथे पंढरपुरे यांच्या घरासमोर तर भामटीपूरा येथे श्याम कावळे यांच्या घरासमोर स्कूल बस व व्हॅनचा थांबा निश्चित करण्यात आला आहे.

Web Title: School bus stops fixed in six cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा