आरोग्य केंद्रात सिकलसेल औषधांचा तुटवडा
By Admin | Updated: January 13, 2016 02:41 IST2016-01-13T02:41:44+5:302016-01-13T02:41:44+5:30
सिकलसेलसारख्या आजारावर वेळीच औषधोपचार होणे गरजेचे आहे. असे असताना येथील आरोग्य केंद्रात

आरोग्य केंद्रात सिकलसेल औषधांचा तुटवडा
रुग्णाला एक महिन्यापासून औषधी नाही
आकोली : सिकलसेलसारख्या आजारावर वेळीच औषधोपचार होणे गरजेचे आहे. असे असताना येथील आरोग्य केंद्रात सिकलसेलच्या रुग्णाला आवश्यक असलेले औषधच उपलब्ध नसल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. येथील आठ वर्षीय बालकाची या आजाराच्या औषधासाठी परवड होत आहे.
येथील आठ वर्षीय बालकाला सिकलसेल आजार झाला आहे. गत तीन वर्षांपासून त्याच्यावर औषधोपचार सुरू आहे. त्याला रोज फॉलिक अॅसिडची गोळी द्यावी लागते. येथील रुग्णालयात ही औषधी उपलब्ध नसल्याने येथील वैद्यकीय अधिकारीही हतबल आहेत. सदर मुलाचे वडील दवाखान्यात गेले असता औषध उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. गंभीर समजल्या जाणाऱ्या आजारावरील उपचार सुलभ व्हावा म्हणून येथील रुग्णालयात पूर्वी औषध दिली जात होती; मात्र गत महिन्यापासून आरोग्य विभागाकडून येथे औषध पुरवठा झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे.(वार्ताहर)