विद्युत चोरीप्रकरणी सावंत रेस्टॉरेंटला ५२ हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 22:32 IST2018-07-20T22:31:33+5:302018-07-20T22:32:44+5:30
महावितरणच्या भरारी पथकाने छापा टाकून स्थानिक सावंग रेस्टॉरेंट मध्ये सुरू असल्याचे वीज चोरीचा प्रकार उजेडात आणला. सदर पथकातील अधिकाऱ्यांनी या रेस्टॉरेंट मालकाला विद्युत चोरी केल्या प्रकरणी ५२ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

विद्युत चोरीप्रकरणी सावंत रेस्टॉरेंटला ५२ हजारांचा दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : महावितरणच्या भरारी पथकाने छापा टाकून स्थानिक सावंग रेस्टॉरेंट मध्ये सुरू असल्याचे वीज चोरीचा प्रकार उजेडात आणला. सदर पथकातील अधिकाऱ्यांनी या रेस्टॉरेंट मालकाला विद्युत चोरी केल्या प्रकरणी ५२ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. शिवाय वेळीच दंड न भरल्यास पुढील कारवाईस सामोरे जावे लागेल याची माहितीही दिली.
मोठ्या प्रमाणात विद्युतचा वापर असताना विद्युत देयक कमी येत असल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांना स्थानिक विकास चौकातील सावंत रेस्टॉरेंटच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला. दरम्यान महावितरणच्या भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी थेट सावंग रेस्टॉरेंट गाठून बारकाईने पाहणी केली असता विद्युत चोरीचा प्रकार उघडकीस आला. सदर रेस्टॉरेंट हे दशरथ सावंत यांच्या मालकीचे असून सदर रेस्टॉरेंट व्यावसायिकाला विशेष भरारी पथकातील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ५२ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला. तसेच दंड न भरल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहितीही दिली. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकातील सहा. कार्यकारी अभियंता धवड, सेलूचे उपविभागीय अभियंता मनोज खोडे आदींनी केली. विद्युत चोरीची माहिती अधिकाऱ्यांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.