सावित्रीबाई स्त्री शिक्षणाचे चालते बोलते विद्यापीठ
By Admin | Updated: January 7, 2016 02:50 IST2016-01-07T02:50:43+5:302016-01-07T02:50:43+5:30
सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच दीडशे वर्षापूर्वी मुलींसाठी पहिली शाळा सुरू झाली. त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे.

सावित्रीबाई स्त्री शिक्षणाचे चालते बोलते विद्यापीठ
अरूण चौधरी : वर्धा सोशल फोरमतर्फे सावित्रीच्या लेकींचा गौरव
वर्धा : सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच दीडशे वर्षापूर्वी मुलींसाठी पहिली शाळा सुरू झाली. त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सावित्रीबाईंनी पुढाकार घेतल्याने स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळाला. त्या स्त्रीशिक्षणाचे चालते बोलते विद्यापीठ आहेत, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अरूण बी. चौधरी यांनी केले.
स्थानिक विकास भवनात वर्धा सोशल फोरमच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार मंगळवारी करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून चौधरी बोलत होते. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा, जि. प. च्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती श्यामलता अग्रवाल, महिला व बालविकास अधिकारी मनीषा कुरसंगे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, उपपोलीस अधीक्षक रवींद्र किल्लेकर, वर्धा सोशलन फोरमचे अध्यक्ष अभ्यूदय मेघे, सचिव अविनाश सातव सुधीर पांगूळ यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही विचार व्यक्त केले. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवल्यानेच आज समाज संतुलित असल्याचे विचार व्यक्त करण्यात आले. यावेळी महर्षी विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
प्रास्ताविक अभ्युदय मेघे यांनी केले. यशस्वीतेसाठी सचिव अविनाश सातव, श्रीकांत राठी, इम्रान राही, प्राचार्य उमेशसिंह सेंगर, अनिल नरेडी, डॉ. श्याम पटवा, प्रशांत इंगळे तिगावकर, सुधाकर मेहरे, शालिग्राम टिबडीवाल, विजय देशपांडे, धनंजय सोनटक्के, संजय तिगावकर, रमेशकुमार केला आदींनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)