सातीवासीयांची बसची प्रतीक्षा अखेर संपुष्टात
By Admin | Updated: June 29, 2017 00:44 IST2017-06-29T00:44:08+5:302017-06-29T00:44:08+5:30
नजीकच्या साती येथील विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी बस नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत होता.

सातीवासीयांची बसची प्रतीक्षा अखेर संपुष्टात
लोकमत न्यूज नेटवर्क
मोझरी (शेकापूर) : नजीकच्या साती येथील विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी बस नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत होता. प.सं. सदस्य अमोल गायकवाड यांच्याकडे विद्यार्थी व प्रवाशांनी ही समस्या मांडली. साती गावापर्यंत बसफेरी सुरू करण्याची मागणी आगार प्रमुखांकडे करण्यात आली. वर्धा-वरुड बसफेरी सातीपर्यंत वाढविण्यात आल्याने सातीवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
साती हे गाव वर्धा-हिंगणघाट तालुक्याच्या सीमेवर आहे. येथील विद्यार्थी व नागरिकांना कोणत्याही कामाकरिता मोझरी येथे यावे लागते. शालेय व दैनंदिन कामासाठी ये-जा करताना विद्यार्थ्यांना बसअभावी पायपीट करावी लागत. मोझरी(शे.) येथे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी ६ कि़मी. अंतराचा प्रवास चालत जाऊन करतात. साती हे गाव वरूड गटग्रामपंचायत अंतर्गत येत असल्याने सदर बसफेरी वाढविण्याची मागणी होती. ग्रामपंचायतने ठराव घेऊन प.स्ां. सदस्य अमोल गायकवाड यांच्या नेतृत्त्वात आगाराकडे पाठपुरावा केला. वरुडपर्यंत येणारी बसफेरी सातीपर्यंत वाधविण्यात आल्याने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यायमध्ये जाणे-येणे सोयीस्कर होणार आहे.