अपक्षाला सरपंचपद
By Admin | Updated: July 31, 2015 02:12 IST2015-07-31T02:12:25+5:302015-07-31T02:12:25+5:30
येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक गुरुवारी पार पडली.

अपक्षाला सरपंचपद
भाजप-मनसेची खेळी : कॉग्रेस सत्तेपासून दूर
गिरड : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक गुरुवारी पार पडली. १५ सदस्यीय असलेल्या या ग्रामपंचायतीत तीन अपक्ष, भाजप समर्थित तीन व मनसे समर्थित तीन सदस्यांत युती झाली. या नऊ सदस्यांनी केलेल्या युतीतून अपक्षाला सरपंचपदाची लॉटरी लागली.
सरपंचपद महिलांकरिता राखीव असल्याने अपक्ष उमेदवार चंदा प्रभाकर कांबळे यांची वर्णी लागली. उपसरपंचपदी मनेसेचे विजय कृष्णा तडस यांची वर्णी लागली. आ. समीर कुणावार यांच्या नेतृत्वातील परिर्वतन विकास आघाडीने ग्रा.पं. सत्ता काबीज केली.
या निवडणुकीत सरपंच व उपसरपंच्पदासाठी सेना व काँग्रेस युतीच्या शालू श्रीराम शिसक तर उपसरपंचदासाठी सेनेचे हमीद पटेल उमेदवार होते. कांबळे यांनी नऊ मते घेतली तर शिसक यांना सहा मते मिळाली. निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार हेमलता आर्गेलवार, रूपाली देहरे, दत्तात्रय दिवटे, कापसे यांनी काम पाहिले.(वार्ताहर)
राखीवपद ठरले सरपंचपदाची किल्ली
येथील ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिलेकरिता राखीव होते. यामुळे महिला उमेदवार असलेल्या अपक्षांची सरपंचपदाची मागणी होती. गत पंचवार्षिकेत येथे काँग्रेस व भाजपच्या युतीची सत्ता होती. त्यांची युती यंदाही कायम होती. सरपंच पदाकरिता त्यांच्याकडे महिला उमेदवार असल्याने अपक्ष महिलेला सरपंचपद देण्यास त्यांच्याकडून नकार दिसत असल्याने यंदा हे नवे समीकरण पुढे आले. सरपंचपदाकरिता महत्त्वाचे ठरलेले तीनही उमेदवार गत निवडणुकीत काँग्रसेकडून निवडून आले होते. यंदा मात्र त्यांनी वेगळा गट तयार करून निवडणूक लढल्याने काँगेसला सत्ता गमवावी लागली.
भाजपाकडे सरपंचपदाचा उमेदवार असताना काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता भाजपने ही खेळी केल्याची चर्चा गावात आहे.