सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीला प्रारंभ
By Admin | Updated: May 15, 2014 23:50 IST2014-05-15T23:50:34+5:302014-05-15T23:50:34+5:30
जिल्ह्यात २३ मार्च रोजी ३0७ ग्रामपंचायतीकरिता मतदान झाले. यानंतर निवडणुकींचे निकालही जाहीर झाले. निवडणुकीत विजयी झालेल्या व सरपंचपदाच्या शर्यतीत असलेल्या

सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीला प्रारंभ
वर्धा : जिल्ह्यात २३ मार्च रोजी ३0७ ग्रामपंचायतीकरिता मतदान झाले. यानंतर निवडणुकींचे निकालही जाहीर झाले. निवडणुकीत विजयी झालेल्या व सरपंचपदाच्या शर्यतीत असलेल्या उमेदवारांना सरपंच पदाची प्रतीक्षा लागली होती. ही प्रतीक्षा गुरुवारी संपली. जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीला प्रारंभ झाला. जिल्ह्यात इतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या दिवसात होतील. सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुकाचा कार्यक्रम २७ मे पर्यंत सुरू राहणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने कळले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) सेलू तालुक्यातील सुकळी(बाई) या नऊ सदस्यीय ग्रामपंचायतीकरिता सरपंच, उपसरपंचाची निवडणूक अधिकारी व्ही.बी. बिल्लेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. सरपंच पदी दिलीप खिराळे तर उपसरपंचपदी अनिल म्हैसगवळी यांची बहुमताने निवड केली. यावेळी सहाय्यक म्हणून ग्रामसेवक राजू सपकाळ, तलाठी बाबा पटले यांनी काम पाहिले. खैरी येथील सात सदस्यीय ग्रामपंचायतीकरिता झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी सुधाकर नाखले, उपसरपंच मनिष सुरजूसे यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून एम. व्ही. नागपूरकर, ग्रामविकास अधिकारी ए.व्ही. धमाळे यांनी काम सांभाळले. सोनेगाव(स्टे.) येथील निवडणुकीत सरपंचपदी समता विलास कालगाडगे यांची वर्णी लागली तर उपसरपंचपदी अतुल वसंतराव पवार यांची निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार मंथनवार, ग्रामसेवक संतोष शिंदे यांनी काम पाहिले. इंझापूर येथे भाजप गटाचे सरपंच व उपसरपंच निवडून आले. सरपंचपदी पंकज रामदास येरने, उपसरपंच संजय वासुदेव आलोने यांची निवड झाली. भुगाव येथे सरपंच पदाकरिता प्रिया शरद उगेमुगे यांची बहुमताने निवड झाली. उपसरपंचपदी राजू नत्थू नाखले यांची निवड झाली. केळझर येथील १३ सदस्यीय ग्रामपंचायतीत एक जागा रिक्त असल्याने १२ सदस्यांनी मतदान केले. यात सरपंचपदी रेखा विलास शेंडे, उपसरपंच फारुख करीम शेख यांची बहूमताने निवड केली. निवडणूक अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी माने यांनी काम पाहिले. गायमुख-जुनगढ या गट ग्रामपंचायतीत सरपंच पदावर आनंद पिंपळे, उपसरपंचपदी पुष्पा नेहारे यांची निवड झाली. निवडणूक अधिकारी एन.डी.बेताल, ग्रामसेवक सिंधू डोंगरे, तलाठी पावडे यांनी काम पाहिले. विजयगोपाल ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली. ग्रामपंचायतच्या निवडणुकीत ११ पैकी १0 उमेदवार ग्रामसुधार समितीचे उमेदवार बहूमतांनी निवडून आले. सरपंचपदी निलम संजय बिन्नोड यांची एक मताने निवड झाली. तर उपसरपंच पदी साहेबराव शंकर कलोडे यांची निवड करण्यात आली.