शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील सराईत चोरटा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 22:25 IST

बंद घरांना लक्ष्य करून २० पेक्षा अधिक चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्यास गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीजवळील डोंगरगाव येथून गुरुवारी, ३ डिसेंबरला अटक केली. संजय मून (५०) रा. बेला, ता. उमरेड, जि. नागपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

ठळक मुद्देघरफोडीचे २० गुन्हे उजेडात : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बंद घरांना लक्ष्य करून २० पेक्षा अधिक चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्यास गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीजवळील डोंगरगाव येथून गुरुवारी, ३ डिसेंबरला अटक केली. संजय मून (५०) रा. बेला, ता. उमरेड, जि. नागपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. चोरट्याकडूनपोलिसांनी रोख आणि सोन्या-चांदीचा ऐवज जप्त केला.मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने संशयित व्यक्ती संजय मधुकर मून, रा. नागपूर याला ताब्यात घेतले. मागील दोन महिन्यांपासून गुन्हे शाखेची चमू त्याच्या मागावर होती. अनेकवेळा त्याने पोलिसांना हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. आरोपी अनेकवेळा वर्धा जिल्ह्यात आला. सेवाग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धन्वंतरीनगर, वैशालीनगर, उगले ले-आऊट वरूड, सेवाग्राम आदी ठिकाणी घरफोडीचे २० गुन्हे केल्याची चोरट्याने कबुली दिली. २० पैकी १३ गुन्हे सेवाग्राम पोलीस ठाण्यात दाखल आहेत.२६ आॅगस्ट २०१८ ला रात्रीच्या सुमारास रूपेश अशोक ठोंबरे, रा. वरूड कपील वस्ती सोसायटी, हे कुटुंबासह झोपले असता चोरटयाने स्वयंपाकल खोलीच्या मागील दार, खिडकीतून हात टाकून कडी उघडत घरात प्रवेश करून बॅगमधील डबीतले सोन्याचे २ तोळयाचे गोफ अंदाजे किंमत ३० हजार रुपये, सोन्याची डिझाईन असलेली ४ ग्रॅमची अंगठी सोन्याचे मंगळसूत्र, रोख व इतर दागिने ७४ हजार १५० रुपयांचा ऐवज पळवून नेला होता. याबाबत सेवाग्राम येथे गुन्हा दाखल होता. तपासाअंती संजय मून याला अटक करण्यात आली.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार, महेंद्र इंगळे, उदयसिंग बारवाल, नामदेव किटे, परवेज खान, दिवाकर परिमल, नरेंद्र डहाके, हरिदास काकड, अमर लाखे, आनंद भस्मे, वैभव कट्टोजवार, सचिन खैरकर, अमित शुक्ला, कुलदीप टांकसाळे, नीलेश कट्टोजवार, अक्षय राऊत, चालक आत्माराम भोयर आदींनी केली.दोन महिन्यांपासून देत होता हुलकावणीहा सराईत चोरटा कधी सुरक्षारक्षकाच्या वेशात, तर कधी एखाद्या अधिकाºयाप्रमाणे राहणीमान ठेवत घरफोड्या करायचा. तो नागपूरहून काजीपेठ या रेल्वेगाडीने येत वरुड येथे उतरायचा. रात्री चोºया केल्यानंतर दुसरे दिवशी सकाळच्या पॅसेंजरने परत जायचा. या दरम्यान पोलिसांनी त्याला गाठले असता अनेकवेळा त्याने दिशाभूल केली. मागील दोन महिन्यांपासून तो पोलिसांना हुलकावणी देत होता.तब्बल १५ वर्षे भोगली शिक्षाआरोपीवर नागपूर येथे घरफोडीच्या ९८ तर सेवाग्राम ठाण्यात १३ गुन्हे दाखल आहेत. ७ जणांनी घटनेची नोंदचे केली नाही. आरोपीने वेगवेगळया गुन्ह्यांत तब्बल १५ वर्षे शिक्षा भोगली आहे.

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस