वेगळ्या विदर्भाकरिता समुद्रपूर-हिंगणघाट बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 22:31 IST2017-12-11T22:30:52+5:302017-12-11T22:31:44+5:30
वेगळ्या विदर्भाच्या मागणीकरिता विदर्भवादी संघटनांनी विदर्भात बंदचे आवाहन केले होते.

वेगळ्या विदर्भाकरिता समुद्रपूर-हिंगणघाट बंद
आॅनलाईन लोकमत
हिंगणघाट/समुद्रपूर : वेगळ्या विदर्भाच्या मागणीकरिता विदर्भवादी संघटनांनी विदर्भात बंदचे आवाहन केले होते. त्या आवाहनानुसार जिल्ह्यात बंद राहील असे वाटत असताना केवळ समुद्रपूर व हिंगणघाट येथे बंद पाळण्यात आला. तर पुलगाव येथे मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यात इतर ठिकाणी मात्र या बंदला पाठ दाखविण्यात आली.
हिंगणघाट येथे या मोर्चाद्वारे आम्ही विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ राज्य आंदोलन समिती व जनमंच हिंगणघाट-समुद्रपूर तालुका यांच्यावतीने महाराष्ट्र राज्यामधून विदर्भ राज्य निर्माण व्हावे. विदर्भातील समस्या मार्गी लागाव्या, शेतकºयांच्या शेतमालाला खर्चाच्या आधारभूत हमीभाव मिळावा व होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी, विदर्भातील युवकांना रोजगाराविषयी असणारी उदासिनता व उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत असणारी तफावत यांचा निषेध म्हणून बंद पुकारण्यात आला होता. या बंद दरम्यान शहरातून काढण्यात आलेल्या मोर्चात या भागातील विदर्भवादी सहभागी झाले होते.
यावेळी मोर्चेकºयांनी उपविभागीय अधिकाºयांना एका निवेदनाद्वारे आपल्या मागण्यांची माहिती दिली. निवेदन देताना पूर्व विदर्भ विभाग प्रमुख अनिल जवादे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मधुसूदन हरणे, विधानसभा अध्यक्ष संदीप रघाटाटे, तालुका अध्यक्ष जयंता धोटे, शहर अध्यक्ष युवा, हिंगणघाट अजय मुळे, शकील अहमद, अश्विन तावाडे, रहमत खाँ पठाण आदी उपस्थित होते.
समुद्रपूर येथे बंद आंदोलनाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील आंदोलनात उल्लास कोटमकर, डॉ हेमंत इसनकर, प्रविण महाजन, जीवन गुरनुले, शेषराव तुळनकर, चांगदेव मुंगल, केशव भोले, वासुदेव देवढे, दिनेश नारंजे, मनीष निखाडे, शुभम बढ़ाई शांतिलाल गांधी, किसनजी शेंडे, ओम उरकंडे, अनिल जवादे, सुनील हिव्से, शुभम झगडे, चेतन भोयर, प्रथमेश वाढई यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.