वर्ध्यात समीर देशमुख यांचा राष्ट्रवादी कॉँग्रेसला रामराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 15:32 IST2019-09-10T15:31:40+5:302019-09-10T15:32:56+5:30

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष सुरेश देशमुख यांचे चिरंजीव समीर देशमुख यांनी मंगळवारी दुपारी २.३० वाजता शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

Sameer Deshmukh of Wardha now in Shivsena | वर्ध्यात समीर देशमुख यांचा राष्ट्रवादी कॉँग्रेसला रामराम

वर्ध्यात समीर देशमुख यांचा राष्ट्रवादी कॉँग्रेसला रामराम

ठळक मुद्देउध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा- राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष सुरेश देशमुख यांचे चिरंजीव समीर देशमुख यांनी मंगळवारी दुपारी २.३० वाजता शिवसेना भवनात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. समीर देशमुख हे राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते व बराच काळ वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत समीर देशमुख यांनी वर्धा लोकसभा मतदार संघात कॉँग्रेसच्या उमेदवार चारूलता टोकस यांच्या विरोधात जाहीररित्या प्रचार केला होता. तेव्हापासूनच ते राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला रामराम करतील, अशी शक्यता होती. अखेरीस त्यांनी मंगळवारी पत्नी प्रियंका यांच्यासह शिवबंधन बांधले. त्यांना वर्धा जिल्ह्यातील देवळी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Sameer Deshmukh of Wardha now in Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.