सेलूत टायफार्ईड रक्त तपासण्याची किट संपली
By Admin | Updated: September 20, 2014 23:55 IST2014-09-20T23:55:24+5:302014-09-20T23:55:24+5:30
जिल्ह्यात व तालुक्यातही डेंग्यू, मलेरीया, टायफाईडची साथ सुरू आहे. गत तीन दिवसांपासून या रुग्णालयात टायफाईडचे रक्त तपासण्याची किट उपलब्ध नाही. त्यामुळे मलेरियाची तपासणी केल्यावर

सेलूत टायफार्ईड रक्त तपासण्याची किट संपली
प्रफुल्ल लुंगे - सेलू
जिल्ह्यात व तालुक्यातही डेंग्यू, मलेरीया, टायफाईडची साथ सुरू आहे. गत तीन दिवसांपासून या रुग्णालयात टायफाईडचे रक्त तपासण्याची किट उपलब्ध नाही. त्यामुळे मलेरियाची तपासणी केल्यावर तो जर निगेटीव्ह निघाला तर टायफाईड असू शकतो याचा अंदाज लावून अनेक रुग्णांना निदानाअभावी टायफाईडचेही औषध दिल्या जात आहे.
येथील ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्याअभावी वाऱ्यावर असल्याचे वृत्त शनिवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच खळबळ उडाली. वृत्त प्रकाशित होताच येथील ग्रामीण रुग्णालयात साहित्याची वाणवा असल्याचेही समोर आले आहे. साहित्य नसल्याने या रुग्णालयात अंदाजाच्या आधारावर रुग्णाला औषध देण्यात येत असल्याने येथे येणाऱ्या रुग्णांचे जीवन धोक्यात आले आहे. यात आणखी कळस म्हणजे येथील प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञानाचे पदही रिक्तच आहे.शासन आरोग्य सेवेवर कोट्यवधी रुपये खर्च करते. त्याचा नाममात्र उपयोग प्रशासनातील उदासीनतेमुळे गरजू रुग्णांना होत नाही. यामुळे शासकीय रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याची भावना वाढत असून रुग्ण खासगी रुग्णालयाकडे वळत असल्याचे चित्र आहे.