शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

‘यू-ट्यूब’वर घेतले चोरीचे धडे अन् ‘ओएलएक्स’वर विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:06 IST

मोबाईल चोरीबाबत यू-ट्यूबर व्हिडीओ बघत शहरातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानातून मोबाईल लंपास करण्यात आले. तसेच आरोपींनी चोरीच्या या मोबाईलची ओएलएक्सवरून विक्रीही केल्याचे पोलिसांच्या कारवाईत पुढे आले आहे.

ठळक मुद्देटेक्नोसेवी मोबाईल चोरांची टोळी पोलिसांच्या गळाला : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मोबाईल चोरीबाबत यू-ट्यूबर व्हिडीओ बघत शहरातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानातून मोबाईल लंपास करण्यात आले. तसेच आरोपींनी चोरीच्या या मोबाईलची ओएलएक्सवरून विक्रीही केल्याचे पोलिसांच्या कारवाईत पुढे आले आहे. प्रगत तंत्रानाचा वापर करीत नियोजनबद्ध चोरी करून महागड्या मोबाईलची विक्री करणाऱ्या या तिन सदस्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे या तीन चोरट्यांपैकी दोघे अल्पवयीन असून एक आरोपी १९ वर्षाचा आहे. शिवाय तिघेही आरोपी उच्च शिक्षित कुटुंबातील आहेत.स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिन युवकांना ताब्यात घेतले. त्यांना विचारणा केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. चोरट्यांनी दिलेली माहिती ऐकून पोलीस अधिकारी व कर्मचारी थक्क झालेत. त्यांच्याकडून पोलिसांनी नियोजनबद्धपणे शहरातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानातून चोरी केलेले दोन महागडे मोबाईल जप्त केले आहे. हे मोबाईल या चोरट्यांनी ओएलएक्सवर विकले होते. सदर प्रकरणातील आरोपी असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा हा आर्वी नाका भागातील मानस मंदिर परिसरातील रहिवासी असून त्याचे वडील आष्टी येथील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. १६ वर्ष वय असलेल्या आरोपी नालवाडी भागातील देशपांडे ले-आऊट येथील रहिवासी आहे. त्याचे वडील बांधकाम अभियंता असून तिसरा आरोपी असलेल्या आदेश रत्नाकर ढेंगरे (१९) रा. सिंदी (मेघे) याची आई रा.प.म. मध्ये कार्यतर आहे. हे तिनही उच्च शिक्षित कुटुंबातील असले तरी त्यांनी चोरी करण्याचे आणि चोरीच्या साहित्याची विल्हेवाट लावण्याचे धडे ज्या पद्धतीने घेत काम फत्ते केले यामुळे पोलिसांच्याही भुवया उंचावल्या. सदर चोरट्यांकडून पोलिसांनी ३० हजारांचे दोन महागडे माबाईल, दोन दुचाकी असा एकूण १ लाख ५० हजारांचो मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. तेली, अप्पर पोलीस अधीक्षक पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात प्रमोद जांभुळकर, हितेंद्र परतेकी, यशवंत गोल्हर, दिनेश बोथकर, अक्षय राऊत, संघसेन कांबळे, विकास अवचट, रितेश शर्मा, येल्ले आदींनी केली.मोबाईल खरेदीच्या निमित्ताने दुकानात प्रवेशमोबाईल खरेदी करायचा असल्याचा देखावा करीत या टोळीतील दोन सदस्य मोबाईलच्या दुकानात प्रवेश मिळवित होते. दुकानात प्रवेश मिळविल्यानंतर सदर दोघेही एकमेकांना ओळखत नाहीत असाच ते देखावा करीत. दरम्यान एक जण मोबाईल बघता-बघता तो मोबाईल आपल्या ताब्यात घेत दुकानाबाहेर दुचाकी घेवून उभा असलेल्या टोळीतील तिसऱ्या सदस्यासोबत घटना स्थळावरून पळ काढत. याच दरम्यान दुकानात प्रवेश मिळविला आणि टोळीतच एक सदस्य असलेला तरुण दुकानदाराला काय झाले साहेब अशी विचारणा करीत त्याला व्यस्त करून आपल्या साधीदाराला पळण्याची संधी उपलब्ध करून देत असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.शिकवणीचे पैसे खर्च झाल्यावर नवी युक्तीसदर टोळीतील चोरट्यांपैकी एकाच्या कुटुंबियांनी त्याला शिकवणीसाठी पैसे दिले होते. मात्र, ते पैसे नियोजित कामासाठी न वापरता या तिघांनी दुसऱ्याच गोष्टीसाठी खर्च केले. पुन्हा पैसे कुठून आणाचे हाच विचार डोक्यात ठेवून या तिघांनी यू-ट्यूबवर चोरी कशी करावी याचा व्हिडीओ बघून त्याचा अवलंब केला. शिवाय रामनगर भागातील दोन दुकानातून मोबाईलची चोरी केली. इतक्यावरच हे चोरटे थांबले नाही तर त्यांनी चोरीचे मोबाईल ओएलएक्सवर टाकून त्याची विक्री केली. ते मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे.या प्रकरणातील तिनही आरोपींना आम्ही ताब्यात घेतले आहे. त्यांनी चोरीची कबुली दिली आहे. तिनही आरोपी उच्च शिक्षित कुटुंबातील आहेत. त्यांनी चोरीचे धडे यू-ट्यूबवर व्हिडीओ बघून घेतले. शिवाय त्यांनी चोरीच्या मोबाईची ओएलएक्सवरून विक्री केली. ते मोबाईल व इतर साहित्य आम्ही जप्त केले आहे. आरोपींमध्ये दोघे अल्वपयीन असून आपला मुलगा कुठल्या वाईट संगतीत तर नाही ना या बाबतची दक्षता पालकांनी घेतली पाहिजे.- निलेश ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक, स्था. गु. शा. वर्धा.

टॅग्स :theftचोरी