शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

दोन एकर संत्रा बागेतून ‘सागर’ने घेतले १० लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 05:00 IST

सन २०१५मध्ये शासकीय राष्ट्रीय बाग - वानी बोर्डाचे संचालक पनवार यांच्या मार्गदर्शनात सागरने २० एकर शेतीपैकी १२ एकरमध्ये २००० संत्रा फळझाडांची लागवड केली. यापैकी २ एकर जमिनीत इस्त्राईल  तंत्रज्ञान पद्धतीने संत्रा लावला. ३ एकरांत काकडी, टोमॅटो, भेंडी व फुलशेती सुरू केली. काकडी, टोमॅटो व फुलशेतीतून लाखो रुपयांचे तो उत्पादन घेत आहे.  २ एकरात इस्त्राईल पद्धतीने लावलेल्या संत्रा बागेतून यावर्षी त्याने  १० लाख रुपयांचे उत्पन्न घेतले.

अरूण फाळकेलोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे) : जिद्द, प्रयत्न आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर युवा शेतकऱ्याने प्रतिकूल परिस्थितीतही उत्कृष्ट व प्रगतशिल शेतकरी म्हणून वाटचाल सुरु केली आहे. त्याची ही वाटचाल इतर शेतकऱ्यांसाठी मात्र, प्रेरणादायी ठरत असल्याचे चित्र आहे. आदिवासीबहुल जोगा गावातील सुशिक्षित युवा शेतकरी सागर गजानन पुरी (३२) याने दोन एकर संत्रा बागेतून यावर्षी तब्बल १० लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. सागरचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले असून, त्याच्याकडे वडिलोपार्जित २० एकर शेती आहे. तो एखाद्या शाळेत किंवा सहकारी बँकेत लिपिकाची नोकरी करू शकला असता. पण, त्याने नोकरी न करता वडिलोपार्जित शेती, पारंपरिक पद्धतीला बगल देऊन आधुनिक पद्धतीने शेती करून अर्थार्जनाचे मुख्य साधन बनवायचे, असा ध्यास घेतला आणि वयाच्या अवघ्या २५व्या वर्षापासूनच पुढील वाटचाल सुरु केली. सन २०१५मध्ये शासकीय राष्ट्रीय बाग - वानी बोर्डाचे संचालक पनवार यांच्या मार्गदर्शनात सागरने २० एकर शेतीपैकी १२ एकरमध्ये २००० संत्रा फळझाडांची लागवड केली. यापैकी २ एकर जमिनीत इस्त्राईल  तंत्रज्ञान पद्धतीने संत्रा लावला. ३ एकरांत काकडी, टोमॅटो, भेंडी व फुलशेती सुरू केली. काकडी, टोमॅटो व फुलशेतीतून लाखो रुपयांचे तो उत्पादन घेत आहे.  २ एकरात इस्त्राईल पद्धतीने लावलेल्या संत्रा बागेतून यावर्षी त्याने  १० लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. अत्यंत मेहनतीने व आधुनिक पद्धतीने शेती करून उच्च उत्पादन करण्याचा सागरचा मानस आहे. अर्थात शेती करताना खंडित विद्युत पुरवठा, मजुरांची कमी, शेतमालाला मिळत असलेला कमी भाव आणि बाजार पेठेची उणीव भासते, अशी खंत सागरने यावेळी व्यक्त केली.  

रासायनिक खताला दिली बगलरासायनिक खतांचा वापर टाळून सागरने कंपोस्ट खत, जैविक खत, शेणखत आणि गांडूळ खतांचा जास्त प्रमाणात वापर केला. पारंपरिक सिंचन पद्धतीला बगल देऊन ठिबक, तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब त्याने केला. आजघडीला त्याच्याजवळ शेतमशागतीसाठी रोटावेटर, बी. बी. एफ. व स्प्रेइंग युनिट पेरणीयंत्र, नांगरणीचा अद्ययावत ट्रॅक्टर आदी आधुनिक साधने असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगतशील शेती तो करीत आहे.

इस्त्राईल शेती दौऱ्यातून घेतली माहिती आधुनिक शेती तंत्रज्ञान माहिती होण्यासाठी सागरने शासनाच्या कृषी विभागातर्फे फेब्रुवारी २०१९मध्ये आयोजित इस्त्राईल शेती दौऱ्यात प्रत्यक्ष सहभागी होत सखोल माहिती घेतली. बारामती येथे आयोजित केलेल्या कृषी विज्ञान शिबिरात भाग घेतला. कारंजा तालुका कृषी विभागाचे सागर नेहमीच मार्गदर्शन घेतो. वर्धा जिल्हा ॲग्रोप्रोड्युसर संघटनेचा सागर क्रियाशील सभासद असून, तो करीत असलेली आधुनिक व प्रगतशील शेती पाहण्यासाठी कारंजा तालुक्यातील आणि वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकरी गर्दी करतात.

 

टॅग्स :agricultureशेती