पांढुर्णा आश्रम शाळेची सुरक्षा वाऱ्यावर

By Admin | Updated: September 29, 2015 03:31 IST2015-09-29T03:31:00+5:302015-09-29T03:31:00+5:30

दीड एकराचा परिसर मात्र चारही बाजूला आरक्षित वन... १७१ विद्यार्थी.. सुरक्षेच्या नावावर तुटक्या फाटकाचे कुंपण.. अशी

The safety of the school at the Whitehurna Ashram | पांढुर्णा आश्रम शाळेची सुरक्षा वाऱ्यावर

पांढुर्णा आश्रम शाळेची सुरक्षा वाऱ्यावर

अमोल सोटे ल्ल आष्टी (शहीद)
दीड एकराचा परिसर मात्र चारही बाजूला आरक्षित वन... १७१ विद्यार्थी.. सुरक्षेच्या नावावर तुटक्या फाटकाचे कुंपण.. अशी अवस्था पांढुर्णा येथील आश्रम शाळेची आहे. या शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण राज्यभर गाजले. या घटनेमुळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची लक्तरे उघडी पडली. या आश्रम शाळेतील वस्तुस्थिती प्रत्यक्ष जाणून घेतली असता येथील मुलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याची धक्कादायक बाब पुढे आली. ही आश्रम शाळा शासनाच्या लेखी दुर्लक्षित तर आहेच शिवाय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पही आपले पालकत्व सिद्ध करण्यास सपशेल नापास झाल्याचे दिसून आले.
या आश्रमशाळेत आदिवासी बांधवांची १७१ मुले-मुली शिक्षणासाठी वास्तव्यास आहे. त्यापैकी ५६ मुली आहे. या ठिकाणी त्या मानाने सोई-सुविधांचा अभाव आहे. सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नाही. कुणीही केव्हाही या कोणाचीही आडकाठी नाही. आश्रम शाळा व्यवस्थापनाकडूनच येथे नियमांची वाट लावली जात आहे. आपली मुले घरापासून, गावापासून दूरवर शिक्षणासाठी पाठविली. मात्र आपली मुले व्यवस्थित आहेत वा नाही ही चिंताही आहेच. बाहेरच्या कंत्राटदाराचा चौकीदार येथील मुलींचे लैंगिक अत्याचार करतो. या घटनेवरुन या आश्रम शाळेतील विदारक स्थितीचा प्रत्यय आल्यावाचून राहात नाही.

ंपिण्याच्या पाण्याची टाकी घाणीने माखलेली
४वसतिगृहासमोरील पिण्याच्या पाण्याची टाकी घाणीने माखली आहे. सौर उर्जा युनिट वर्षभराआधी लावले होते. याचीही पूर्ण वाट लागली आहे. या युनिटच्या प्लेट उन्हामुळे तडकल्याची माहिती अधीक्षक बाभुळकर यांनी दिली. एवढे मोठे युनिट अल्पावधीतच बंद पडले आहे.
विंधन विहिरीचे पाणी बंद
४वसतिगृह इमारतीचे बांधकाम झाल्यावर येथे विंधन विहीर तयार करण्यात आली. यामध्ये एक दगड अडकला आहे. तो दीड वर्षांपासून तसाच आहे. या कारणावरुन पाणीपुरवठा ठप्प आहे. याच कारणाने इमारत हस्तांतरित करण्याचे सोपस्कार रखडल्याची माहिती आहे. यावरुन आदिवासी आश्रमशाळा चालविणारा विभाग किती जागृत आहे, याचा प्रत्यय येत आहे.
आश्रमशाळा प्रभारींवर
४दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार प्रकरणात मुख्याध्यापक खडसे, अधीक्षक रंगारी, अधीक्षिका दिघोरे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. तेव्हापासून आश्रम शाळा प्रभारींवर आहे. मुख्याध्यापकाचा प्रभार शिक्षक भस्मे, अधीक्षकाचा शिक्षक बाभुळकर शिक्षिका कांबळे यांच्या खांद्यावर आहे. या तिघांनाही अध्यापनाचे काम करून वसतिगृहाचा कारभार चालवावा लागत असल्यामुळे त्यांचाही चांगलीच कसरत होताना दिसून आले आहे.

प्रवेशद्वार अर्धवट
४आश्रमशाळेच्या प्रवेशावरील गेटचा अर्धा भागच अस्तित्वात नाही. यामुळे आश्रम शाळेच्या आवारात पांढुर्णा गावातील गायी, बकऱ्या चरण्यासाठी बिनदिक्तपणे आणल्या जातात.

गहू, डाळ, तेल व मीठ नाही
४आश्रमशाळेमध्ये आदिवासी प्रकल्प कार्यालय नागपूरकडून गहू, डाळ, तेल, मीठ या वस्तुंचा पुरवठा होत होता. मात्र यावर्षी कुठल्याही वस्तु पुरविण्याची निविदा झाली नाही. त्यामुळे सर्व पुरवठा ठप्प आहे. येथील अधीक्षक उसणवारीवर या वस्तू विकत आणून वेळ निभावून नेत असल्याची माहिती आहे. याकडे शासनाचे कायमचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.

Web Title: The safety of the school at the Whitehurna Ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.