उद्योगांची सुरक्षा वाऱ्यावर

By Admin | Updated: November 1, 2014 23:11 IST2014-11-01T23:11:17+5:302014-11-01T23:11:17+5:30

कुठल्याही कंपनीत किंवा औद्योगिक संस्थानात काम करताना तेथील सर्वच कर्मचारी वर्गाची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची असते. त्याचे नियमनही होणे सर्वात आवश्यक आहे, परंतु जिल्ह्याचा विचार करता शासकीय

Safety of industries in the wind | उद्योगांची सुरक्षा वाऱ्यावर

उद्योगांची सुरक्षा वाऱ्यावर

औद्योगिक सुरक्षा दिन : सुरक्षेबाबत प्रशिक्षणाचाही अभाव
पराग मगर - वर्धा
कुठल्याही कंपनीत किंवा औद्योगिक संस्थानात काम करताना तेथील सर्वच कर्मचारी वर्गाची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची असते. त्याचे नियमनही होणे सर्वात आवश्यक आहे, परंतु जिल्ह्याचा विचार करता शासकीय औद्योगिक वसाहतींमध्ये सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन केले जातेच असे नाही. काहीच दिवसांपूर्वी देवळी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीत स्फोट होऊन एक जण जागीच ठार झाला तर काही जखमी झाल्याने सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा पहावयास मिळाला. त्यामुळे खासगी कंपन्यांच्या तुलनेत शासकीय उद्योगामध्ये सुरक्षाव्यवस्था व त्यातही आगीशी संबंधित सुरक्षा व्यवस्थेबाबत उदासीनता औद्योगिक सुरक्षादिनी पहावयास मिळते. शासकीय असो वा खासगी उद्योगसमुह तेथे काम करताना कामगाराची सुरक्षा करणे किंवा तो काम करताना त्याला कुठलाही धोका होणार नाही याची काळजी कंपनीने घेणे आवश्यक आणि अनिवार्य आहे. जिल्ह्यात फारसे उद्योगसमुह नाही. त्यामुळे हा मुद्दा चर्चिल्या जात नसला तरी लहान मोठ्या घटनांमुळे सुरक्षा व्यवस्था खासगी कंपन्यांच्या तुलनेत तोकडी पडत असल्याचे दिसते.

Web Title: Safety of industries in the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.