शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गावगाड्याचा लोकवाहिनीतून सुरक्षित प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST

सवलतीनंतर पहिल्या दिवशी राज्यपरिवहन महामंडळाला केवळ ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर दोन दिवस सुट्या आणि सण असल्याने प्रवाशी संख्या कमी झाल्यामुळे बसफेऱ्याही कमी झाल्या परिणामी उत्पन्नही कमी आले. पण, गेल्या पाच महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, वाहनचालक व वाहक यांच्यामध्ये जो तणाव निर्माण झाला होता. त्यातून बाहेर पडत नव्या जोमाने सर्व कामाला लागले आहेत.

ठळक मुद्देअर्थव्यवस्थेला चालना : बसस्थानकावर उपाययोजना, जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची घेताहेत नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गावगाड्याशी संपर्क साधून अर्थव्यवस्थेला चालना देणाºया लोकवाहिनीचे चाके गेल्या पाच महिन्यानंतर रुळावर यायला सुरुवात झाली आहे. शासनाने आंतरजिल्हा बसप्रवासाला विना ई-पास परिवानगी दिल्याने गेल्या तीन दिवसांपासून लालपरी जिल्ह्याबाहेर जाऊन प्रवाशांना सेवा देण्यासोबतच झालेल्या नुकसानीलाही भरुन काढण्यासाठी आटापीटा करीत आहे. पण, मर्यादीत प्रवाशी संख्येच्या बेड्या असल्याने ‘आमदनी अठ्ठणी, खर्चा रुपया’ अशीच अवस्था आहे. जिल्ह्यातील विविध आगारातून दररोज राज्य परिवहन महामंडळाच्या २० ते २५ बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये केवळ २२ प्रवाशांनाच विनापास प्रवास करण्याची मुभा असल्याने नागपूर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, काटोल, मोर्शी, उमरेड, वरुड, राळेगाव आदी ठिकाणी बसप्रवास सुरु आहे. सवलतीनंतर पहिल्या दिवशी राज्यपरिवहन महामंडळाला केवळ ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर दोन दिवस सुट्या आणि सण असल्याने प्रवाशी संख्या कमी झाल्यामुळे बसफेऱ्याही कमी झाल्या परिणामी उत्पन्नही कमी आले. पण, गेल्या पाच महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, वाहनचालक व वाहक यांच्यामध्ये जो तणाव निर्माण झाला होता. त्यातून बाहेर पडत नव्या जोमाने सर्व कामाला लागले आहेत. मात्र, प्रशासनाने ठरवून दिलेल्यानुसार बसस्थानकावर बसचे निर्जतुकीकरण करणे, प्रवाशांची नोंद घेणे, बसस्थानकाची स्वच्छता करणे, हॅण्डवॉश व सॅनिटायझरची व्यवस्था करणे आदी उपाययोजना केल्या जो की नाही, याची माहिती घेण्यासाठी ‘लोकमत’ च्या स्थानिक प्रतिनिधींनी थेट वर्धा, पुलगाव, हिंगणघाट व आर्वीचे बसस्थानक गाठले. तेव्हा काही ठिकाणी या सुविधांचा अभाव दिसून आला तर काही ठिकाणी सर्व सुविधा असूनही प्रवाशांकडून त्याचा उपयोग घेतला जात नसल्याचे दिसून आले आहे.वर्धा स्वच्छता आहे पण,वर्धा हे जिल्ह्याचे मुख्यालय असून या ठिकाणी इतर जिल्ह्यातून येणाºया बसेसचे प्रमाण अधिक आहे. सोबतच येथून लगतच्या अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, उमरखेड, राळेगाव, वरुड, मोर्शी, राजूरा या ठिकाणी जाणाºया बसेसचेही प्रमाण अधिक आहे. त्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांचीही संख्या मोठी असते. पण, शासनाने ठरवून दिल्यानुसार बसस्थानकावर बाहेर जिल्ह्यातून आलेल्या आणि बाहेर जिल्ह्यात जाणाºया बसचे निर्जतुकीकरण करण्याची कोणतीही व्यवस्था दिसली नाही.निर्जंतुकीकरणाचा पत्ता नाहीतसेच बसस्थानकावर हात धुण्यासाठी कुठेही हॅण्डवॉश, सॅनिटायझर व पाण्याची व्यवस्था केलेली नव्हती. मात्र, बसमधून प्रवास करणाºया प्रवाशांची वाहकांकडून नोंद घेतली जात होेती. बसमध्ये चढलेल्या प्रवाशांना सोशल डिस्टंन्स ठेऊन बसविले जात होते. यावेळी नागपूरातून आलेल्या एका बसचालकाला विचारले असता नागपूरमध्ये बस सॅनिटाईझ झाली पण, वर्ध्यात तशी सुविधा नसल्याचे सांगितले. त्यामुळे वर्धा आगारानेही प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करण्याची गरज प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :state transportएसटी