रूपेश मृत्यू व जवखेडा हत्याकांडाचा निषेध
By Admin | Updated: November 15, 2014 22:51 IST2014-11-15T22:51:31+5:302014-11-15T22:51:31+5:30
येथील रूपेश मुळे मृत्यू प्रकरण व अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडा (खालसा) येथील हत्याकांडाचा निषेध नोंदविण्याकरिता शनिवारी जिल्हाकचेरीवर मोर्चा काढण्यात आला होता.

रूपेश मृत्यू व जवखेडा हत्याकांडाचा निषेध
वर्धा : येथील रूपेश मुळे मृत्यू प्रकरण व अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडा (खालसा) येथील हत्याकांडाचा निषेध नोंदविण्याकरिता शनिवारी जिल्हाकचेरीवर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात विविध सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी करण्याचे निवदेन मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.
यावेळी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यासह झालेल्या अनेक अत्याचाराच्या प्रकरणाच्या तपासाची मागणी करण्यात आली. या मोर्चात सर्व बौद्ध विहार समिती, किसान अधिकार अभियान, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ, बहुजनएम्पलॉईज फेडरेशन, कास्ट्राईब कल्याण महासंघ, समता शिक्षक संघ, सामाजिक न्याय महासंघ, कामगार संघटना संयुक्त कृती समिती आघाडी, युवा सोशल फोरम, सत्य शोधक महिला प्रबोधिनी, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, निर्माण फाऊंडेशन, विदर्भ कृती समिती, वृत्तपत्र विक्रेता महासंघ, आॅल इंडिया आदिवासी स्टुडंट फेडरेशन, चेतना शिक्षण संस्था, राष्ट्रीय संबुद्ध महिला संघटना, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, राष्ट्र सेवा दल, राजसत्ता आंदोलन, राज्य कर्मचारी महसूल संघटना, वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळ, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, पुरोगामी युवक संघटना व परिवर्तनवादी संघटनांचा समावेश होता. (प्रतिनिधी)