सिंदी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा
By Admin | Updated: September 1, 2014 00:09 IST2014-09-01T00:09:33+5:302014-09-01T00:09:33+5:30
सिंदी (रेल्वे) येथे झालेल्या बलात्काराच्या आरोपींना त्वरित अटक करून सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे़ याबाबत उपविभागीय

सिंदी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा
हिंगणघाट : सिंदी (रेल्वे) येथे झालेल्या बलात्काराच्या आरोपींना त्वरित अटक करून सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे़ याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले आहे़
सिंदी (रेल्वे) येथील प्रकरणाला १० दिवसांचा कालावधी लोटला असताना अद्याप एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही़ हे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घेत चौकशी करणे गरजेचे आहे़ पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला ताब्यात घ्यावे आणि सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणीही नागरिकांनी निवेदनातून केली आहे़ बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे़ बलात्कार करणाऱ्याचे प्राबल्य वाढत आहे. यावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करीत आरोपींना त्वरित अटक करावी. त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात हजर करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे़ अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी निवेदनातून दिला आहे़ निवेदनाच्या प्रती गृहमंत्री, पालकमंत्री तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत़
यावेळी सागर ग्रामीण युवा मंचाचे डॉ. विजय पर्बत, सचिन मोरे, गोपाल जोडांगडे, स्रेहल चिडे, शंकर मोरे, विक्की कापटे, धिरज पाराशर, पप्पू डफ, अशोक मोरे, तुषार हवाईकर, संदेश डेकाटे, उमेश कावळे, रूपेश लाजूरकर व नागरिक उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)