शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल दरवाढविरोधात रायुकाँ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:08 IST

दररोज होणाऱ्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात रायुकाँने आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. रायुकाँ प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख व जिल्हाध्यक्ष संदीप किटे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी कापसे यांच्या पेट्रोल पंपावर वाहन व पेट्रोलपंप चालकांना प्रतिकात्मक कमळ फुल देऊन इंधन दरवाढ तथा शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.

ठळक मुद्देदेवळी, सेलूत आंदोलन : शासनाला पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : दररोज होणाऱ्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात रायुकाँने आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. रायुकाँ प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख व जिल्हाध्यक्ष संदीप किटे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी कापसे यांच्या पेट्रोल पंपावर वाहन व पेट्रोलपंप चालकांना प्रतिकात्मक कमळ फुल देऊन इंधन दरवाढ तथा शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.मागील दहा दिवसांपासून पेट्रोलचे दर पाच रुपयांनी वाढून ८५ रुपयांपेक्षा अधिक तर डिझेलचे दर सात रुपयांपेक्षा अधिक वाढले आहे. पेट्रोल व डिझेलची एवढी दरवाढ जनतेने आजपर्यंत कधीही अनुभवली नाही. सर्वसामान्य जनता, शेतकरी यात होरपळून निघत आहे; पण सरकारला त्यांच्याशी काही घेणेदेणे नाही. इंधनाच्या वाढलेल्या प्रचंड किमती कशा कमी करता येतील, यावर चर्चा करण्यापेक्षा सरकार आपल्या खोट्या विकासात मग्न आहे. अवाजवी कर कमी झाल्यास इंधनाच्या किमती निश्चितपणे कमी होतील; पण सरकारला यावर तोडगा काढायला वेळ नाही. संपूर्ण देश या इंधनाच्या आगीत होळपून निघत आहे. याबाबत समीर देशमुख यांनी वाहनचालकांना कमळ फुल देऊन जाणीव करून दिली. वाहन चालकांनीही ‘सब की भूल कमल का फुल’, असे म्हणत मोदी सरकारचा निषेध केला. आम्हा शेतकºयांना दररोज भाजीपाला वर्धा मार्केटला आणावा लागतो. पेट्रोल व डिझेलचे वाढते दर आम्हाला परवडत नसल्याची प्रतिक्रिया शेतकºयांनी यावेळी दिल्या. पेट्रोलपंप चालकांनी पेट्रोल, डिझेलचे दर आमच्या हाती नसल्याने आम्हाला जाणीव आहे; पण पर्याय नसल्याचे सांगितले. यावेळी जि.प. सदस्य संजय कामनापुरे, संदीप पातुरकर, संकेत तळवेकर, मंगेश वानखेडे, सचिन बिरे, योगेश नाखले, आशिष गावंडे, प्रफुल गावंडे, रोशन वानखेडे, राकेश चाफले यांच्यासह रायुकाँ कार्यकर्ते उपस्थित होते.सेलू येथे जनसंवाद आंदोलनसेलू - चार वर्षांपूर्वी मोदी सरकार सत्तेवर आले आणि आता विकास होईल, अशी अपेक्षा जनता करू लाागली. सत्तेवर येण्यापूर्वी मोठ-मोठ्या जाहिरातींच्या माध्यमातून विकासाचे स्वप्न मोदी सरकारने दाखवून भरभरुन मते आपल्या झोळीत पाडून घेतली. मोदी लाटेत सर्वच तरले; पण आता चार वर्षे लोटूनही कुठलाच विकास जनतेला दिसत नाही. सर्व क्षेत्रात जनतेची परवड होत आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी सेलू येथील विकास चौकाजवळील पेट्रोल पंपाजवळ रायुकाँ प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात जनसंवाद आंदोलन करण्यात आले. प्रतिकात्मक कमळाचे फुल देत चार वर्षांच्या मोदी सरकारच्या कामगिरीवर शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, महिला, बेरोजगार, विद्यार्थी अशा सर्व क्षेत्रातील नागरिकांच्या प्रतिक्रीया घेतल्या. यात सर्वत्र नाराजी दिसून आली. यावेळी पेट्रोल, डिझेल दरवाढ व शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. सेलू येथील जनसंवाद आंदोलनामध्ये विद्याधर वानखेडे, अर्चित निघडे, श्याम वानखेडे, नरेश खोडके, दिलीप गावंडे, शुभम झाडे, कौशल्य काटे, प्रफुल्ल धानकुटे, समीर धांदे, रामू पवार, साहील पवार, इन्जमाम खतीब, पंकज तलवारे, संकेत निस्ताणे, पिंटू चौधरी, शुभम जगदळे, शुभम पोहाणे, मंगेश नलवडे, अंजिक्य तळवेकर, मयूर जंगठे, दिलीप धोंगडे, चेतन पराते, गोलू तेलरांधे यांच्यासह रायुकाँ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Petrolपेट्रोल