शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित डोवाल यांच्यावरच पंतप्रधान मोदींचा विश्वास; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून तिसरी टर्म
2
ठाकरे गटात येण्यास सुषमा अंधारेंची साद; रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, “चांगली संधी...”
3
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; POCSO प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
4
“राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार सत्तेबाहेर काढणे हेच उद्दिष्ट, विधानसभेसाठी...”: नाना पटोले
5
दोनदा घटस्फोट, जुळ्या मुलींची आई चाहत खन्ना पुन्हा प्रेमात? चार वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट
6
सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार
7
Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा
8
यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
9
याला म्हणतात धमाका...! ₹७५ रुपयांचा शेअर दहाच महिन्यांत २३०० वर पोहोचला; गुंतवणूकदार मालामाल
10
सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही... 
11
नागपूर जिल्ह्यात स्फोटकांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी
12
अग्निवीर योजनेत मोठ्या बदलाची तयारी, केंद्र सरकार घेणार आढावा; 'हे' नियम बदलू शकतात
13
अजितदादांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले? चंद्रशेखर बावनकुळेंचे सूचक विधान, म्हणाले...
14
PM Kisan Samman Nidhi : पुढच्य आठवड्यात शेतकऱ्याच्या खात्यात येणार पैसे, तारीखही ठरली!
15
"पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर द्या"; जम्मू-काश्मीर दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक
16
ICC कडून Super 8 साठी पात्र ठरलेल्या ४ संघांची २ गटांत विभागणी; ४ जागांसाठी टफ फाईट 
17
POCSO प्रकरणात माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना अटक होणार का? राज्याचे गृहमंत्री म्हणाले...
18
Free Aadhaar update : मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या प्रोसेस
19
ATM मधून पैसे काढणे महागणार! २ वर्षानंतर 'या' शुल्कात वाढ केली; खिशावर परिणाम होणार
20
भाजपाने शब्द पाळला! जगन्नाथ मंदिराचे सर्व दरवाजे उघडले; भाविकांना दर्शन सुलभ, का होते बंद?

अंगणवाडीशेजारील रोहित्राच्या ग्रिप पळविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 10:18 PM

नजीक च्या वडगाव (जंगली) येथील अंगणवाडी शेजारी असलेल्या रोहित्राच्या सुरक्षा पेटीतून ग्रीप पळविण्यात आल्या आहेत. येथील व्यवस्था सुस्थितीत रहावी याची जबाबदारी लाईनमनची; पण त्याच्याकडूनच दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली जात असल्याने कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. शिवाय विद्युत पुरवठा वेळोवेळी खंडित होत असून याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देलाईनमनचे दुर्लक्ष : वारंवार पुरवठा होतो खंडित

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : नजीक च्या वडगाव (जंगली) येथील अंगणवाडी शेजारी असलेल्या रोहित्राच्या सुरक्षा पेटीतून ग्रीप पळविण्यात आल्या आहेत. येथील व्यवस्था सुस्थितीत रहावी याची जबाबदारी लाईनमनची; पण त्याच्याकडूनच दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली जात असल्याने कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. शिवाय विद्युत पुरवठा वेळोवेळी खंडित होत असून याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.अंगणवाडीतील बच्चेकंपनी रोहित्राच्या आवारात खेळण्यासाठी जात असल्याने लाईनमनचा मनमर्जी कारभार एखाद्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारा ठरत आहे. इतकेच नव्हे तर थोडा जरी वादळी वारा आला तर विद्युत पुरवठा खंडित होतो. शिवाय, लाईनमन गावाबाहेर राहत असल्याने रात्री उशीरा वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना काळोखात रात्र काढावी लागते. सदर प्रकरणी योग्य कार्यवाहीसाठी लाईनमनला नागरिकांनी माहिती दिली. परंतु, दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणची असेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.