वर्ध्यात पोलीस शिपायाचा घरी दिवसाढवळ्या चोरट्याने मारला डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 15:26 IST2018-01-22T15:25:52+5:302018-01-22T15:26:17+5:30

शहर पोलीस स्टेशन अंतर्गत बोरगाव मेघे परिसरातील रिहवासी असलेल्या ज्ञानेश्वर कोराते यांच्या घरून चोरट्याने रोख व सोन्याचे लंपास केले. ही घटना सोमवारी सकाळी ११.३0 च्या सुमारास घडली.

Robbery in day time at police officials house in Wardha | वर्ध्यात पोलीस शिपायाचा घरी दिवसाढवळ्या चोरट्याने मारला डल्ला

वर्ध्यात पोलीस शिपायाचा घरी दिवसाढवळ्या चोरट्याने मारला डल्ला

ठळक मुद्देसोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबविली

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहर पोलीस स्टेशन अंतर्गत बोरगाव मेघे परिसरातील रिहवासी असलेल्या ज्ञानेश्वर कोराते यांच्या घरून चोरट्याने रोख व सोन्याचे लंपास केले. ही घटना सोमवारी सकाळी ११.३0 च्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर कोराते हे सावंगी पोलिस ठाण्यात वाहतूक शिपाई म्हणून कार्यरत आहेत. पोलिस शिपायाच्याच घरी दिवसाला चोरी झाल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. चोराने दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला आणि घरातील सोन्याचा दागिन्यासह मुद्देमाल लांबविला. पोलिसाच्याच घरी चोरी झाल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न या निमित्ताने येथे विचारला जात होता.

Web Title: Robbery in day time at police officials house in Wardha

टॅग्स :Robberyदरोडा