रस्ते, नाल्याच नसलेले कळंबे ले-आऊट

By Admin | Updated: May 23, 2016 02:03 IST2016-05-23T02:03:11+5:302016-05-23T02:03:11+5:30

लोकमत आपल्या दारी उपक्रमांतर्गत लोकमत चमू रविवारी बोरगाव (मेघे) ग्रामपंचायत हद्दीतील कळंबे ले-आऊट वॉर्ड क्र. ३ येथे दाखल झाली.

Roads, drains, leased out, | रस्ते, नाल्याच नसलेले कळंबे ले-आऊट

रस्ते, नाल्याच नसलेले कळंबे ले-आऊट

लोकमत आपल्या दारी उपक्रमांतर्गत लोकमत चमू रविवारी बोरगाव (मेघे) ग्रामपंचायत हद्दीतील कळंबे ले-आऊट वॉर्ड क्र. ३ येथे दाखल झाली. परिसरात दाखल होत असतानाच रस्त्यावर वाहत असलेले सांडपाणी आणि खडबडीत रस्ते येथील नागरिकांना काय समस्या असतील याची साक्ष देत होते. लोकमत चमू पोहोचण्यापूर्वीच नागरिक येथे समस्या मांडण्यासाठी येऊन पोहोचले होते. पक्क्या नाल्या व रस्त्यांचा अभाव, सर्वत्र वाहत असलेल्या सांडपाण्यामुळे पसरलेली दुर्गंधी, नादुरुस्त पथदिवे यामुळे या परिसराला अवकळा आल्याचे दिसले. सरपंच व वॉर्डातील सदस्य मागण्या व समस्यांकडे कधीच लक्ष देत नसल्याचे नागरिक सांगत होते. विशेष म्हणजे कित्येक दिवस त्यांचे दर्शनच होत नसल्याचे सांगण्यात आले. कर आकारणी भरमसाठ होत असली तरी २० वर्षांपासून या भागात थोडासाही विकास झाला नसल्याचे यावेळी आढळून आले.

Web Title: Roads, drains, leased out,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.