पुलाची पाहणी करून रस्ता केला बंद; जड वाहनास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST2020-07-19T05:00:00+5:302020-07-19T05:00:34+5:30
पढेगाव येथील भदाडी नदीच्या पुलाची सुरक्षा भिंत कोसळल्याचे वृत्त दैनिक ‘लोकमत’मध्ये शनिवारला प्रकाशित करण्यात आले. याच वृत्ताची दखल घेऊन चंद्रपूर येथील अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे यांनी शनिवारी पुलाची पाहणी केली व त्वरित पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

पुलाची पाहणी करून रस्ता केला बंद; जड वाहनास बंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : भदाडी नदीवरील पुलाची सुरक्षा भिंत गेली वाहून या शिर्षकाखाली लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता चंद्रपूर चक्क पढेगावात धडकल्या. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
पढेगाव येथील भदाडी नदीच्या पुलाची सुरक्षा भिंत कोसळल्याचे वृत्त दैनिक ‘लोकमत’मध्ये शनिवारला प्रकाशित करण्यात आले. याच वृत्ताची दखल घेऊन चंद्रपूर येथील अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे यांनी शनिवारी पुलाची पाहणी केली व त्वरित पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
पावसाळ्याचे दिवस आहेत. अनुचितय घटना घडू नये याकरिता पुलावरील अर्धा रस्ता वाहतुकीकरिता प्रतिबंधित करण्यात आला. बांबू बांधून मधोमध ड्रम ठेवण्यात आले. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी सूचना काही सूचना केल्या. यावेळी आर.के. इंगळे, एन.आय. टी. नागपूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके, उपविभागीय अभियंता इंद्रकुमार पैठनकर, नेवळी येथील शाखा अभियंता श्रीधर वाघमारे, शाखा अभियंता प्रमोद राणे उपस्थित होते. तसेच सरपंच अनंता हटवार, उपसरपंच गोपाल दुधाने व इतर सदस्यांसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.