कालव्याच्या पाण्यात हरविला पांदण रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST2019-11-25T06:00:00+5:302019-11-25T06:00:04+5:30

कालव्याच्या अपुऱ्या कामामुळे पढेगावसह परिसरात कॅनलच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. शिवाय सदर पाणी शेतात शिरत असल्याने उभ्या पिकांवर त्याचा वितरित परिणाम होत आहे. पढेगाव येथील मौजा अफजलपूर शिवारात निम्न वर्धा धरणाचे पाणी कालव्याद्वारे सोडण्यात आले. परंतु, कालव्याच्या अपूर्ण कामामुळे सोडण्यात आलेले पाणी याच भागातील पांदण रस्त्याने वाहते.

Road lost in canal water | कालव्याच्या पाण्यात हरविला पांदण रस्ता

कालव्याच्या पाण्यात हरविला पांदण रस्ता

ठळक मुद्देपढेगाव येथील प्रकार : २५ शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

विनोद घोडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : नादुरूस्त वितरीकांचा परिसरातील शेतकऱ्यांचा चांगलाच फटका सध्या सहन करावा लागत आहे. अशातच नादुरूस्त वितरीकेमुळे कॅनलचे पाणी थेट पांदण रस्त्याने वाहत असल्याने पढेगाव येथील २५ शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. पाटंधारे विभागाने तातडीने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.
कालव्याच्या अपुऱ्या कामामुळे पढेगावसह परिसरात कॅनलच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. शिवाय सदर पाणी शेतात शिरत असल्याने उभ्या पिकांवर त्याचा वितरित परिणाम होत आहे. पढेगाव येथील मौजा अफजलपूर शिवारात निम्न वर्धा धरणाचे पाणी कालव्याद्वारे सोडण्यात आले. परंतु, कालव्याच्या अपूर्ण कामामुळे सोडण्यात आलेले पाणी याच भागातील पांदण रस्त्याने वाहते. शिवाय अनेक शेतकऱ्यांच्या शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. पांदण रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने त्याच भागातील २५ शेतकऱ्यांना हिवाळ्याच्या दिवसात चिखल तुडवतच शेतात जावे लागत आहे. सध्या रबी हंगामाची तयारी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. विविध कामे झटपट कशी पूर्ण होईल यावर शेतकरीही लक्ष केंद्रीत करून आहे. परंतु, शेतात जाण्यासाठी असलेल्या मार्गावर कॅनलच्या पाण्यामुळे चिखल तयार झाल्याने शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागत आहे. सध्या कपाशी उत्पादक शेतकऱ्यांकडून कापूस वेचणीला गती दिली जात आहे. परंतु, पांढरे सोन अशी ओळख असला कापूस घरी कसा न्यावा असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. या पांदण रस्त्याने साधे पायी जाणेही कठीण असून शेतात बैलगाडी नेण्याची हिम्मतही शेतकºयांची होत नाही. पांदण रस्त्याला तळ्याचे स्वरूप आल्याने शेतकरी धनराज साटोणे, प्रशांत दुर्गे, किशोर तडस, महादेव भट, गजानन दुर्गे, गंगाधर कानेटकर, राजेंद्र दुर्गे, ज्ञानेश्वर गुजरकर, विठ्ठल गुजरकर, सुरेश शेंडे, रामभाऊ शेंडे, किसना कुडमते, विजय अंतुरकर, गोकुल पचारे, गौरव शेंडे, अनिल चोरे यांच्यासह आदी शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे.

Web Title: Road lost in canal water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.