मारडा रस्ता, तलाठी कार्यालयासाठी हवा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 21:41 IST2019-08-10T21:41:00+5:302019-08-10T21:41:30+5:30
आमदार दत्तक ग्राम भोसा ग्रामपंचायतीेच्या वतीने भोसा ते मारडा या रस्त्यासाठी तसेच किरायाच्या इमारतीत असलेल्या तलाठी आणि ग्रामीण डाक कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन समुद्रपूर येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले.

मारडा रस्ता, तलाठी कार्यालयासाठी हवा निधी
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी (रेल्वे): आमदार दत्तक ग्राम भोसा ग्रामपंचायतीेच्या वतीने भोसा ते मारडा या रस्त्यासाठी तसेच किरायाच्या इमारतीत असलेल्या तलाठी आणि ग्रामीण डाक कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन समुद्रपूर येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले.
भोसा व मारडा ही लगतची गावे असून भोसा-मारडा रस्त्याकडे मागील काही वर्षांपासून दुर्लक्ष झाल्यामुळे हा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. ग्रामस्थांकरिता सोईचा रस्ता असून या रस्त्यालगत अनेक शेतकऱ्यांच्या शेती आहेत. रस्त्याच्या दुर्दशेमुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे हा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करावा, रस्त्याचे डांबरीकरण करून रहदारीकरिता मोकळा करण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. येथे अनेक वर्षांपासून तलाठी कार्यालय आणि ग्रामीण डाक घर भाडेतत्त्वावरील इमारतीत आहे. ग्रामपंचायतीकडे जागा उपलब्ध असल्याने नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासह अन्य मागण्यांचे निवेदन ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना समुद्रपूर येथील त्यांच्या जनसंवाद कार्यक्रमात भोसा ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले.
निवेदन देतांना आधार संघटनेचे जिल्हा संघटक दिनेश जाधव, भोसाच्या सरपंच पिंकी अंड्रस्कर, सदस्य महेश अवचट, प्रवीण अंड्रस्कर, नाना चौधरी, आधार संघटनेचे तालुका अध्यक्ष शुभम झाडे, सचिव मंगेश मिस्किन, आकाश अंड्रस्कर ग्रामस्थ आणि आधार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामस्थांची गैरसोय
भोसा-मारडा रस्त्याची दुरवस्था झालेली असून अतिक्रमणानेही विळखा घातला आहे. मात्र, लोकप्रतिनिधींचेयाकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.