राज्यमार्गावरील उड्डाणपुलाजवळ रस्ता दुभाजक क्षतिग्रस्त
By Admin | Updated: November 14, 2015 02:30 IST2015-11-14T02:30:41+5:302015-11-14T02:30:41+5:30
वर्धा-नागपूर राज्य मार्गावर सेलू येथील उड्डाणपूलापूर्वी असलेले रस्ता दुभाजक अनेक वर्षापासून तुटून पूर्णत: क्षतिग्रस्त झाले आहे.

राज्यमार्गावरील उड्डाणपुलाजवळ रस्ता दुभाजक क्षतिग्रस्त
अपघात वाढले : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे दुर्लक्ष
सेलू : वर्धा-नागपूर राज्य मार्गावर सेलू येथील उड्डाणपूलापूर्वी असलेले रस्ता दुभाजक अनेक वर्षापासून तुटून पूर्णत: क्षतिग्रस्त झाले आहे. त्याचे विखुरलेले अवशेष केवळ आता शिल्लक आहे. मात्र याकडे रस्ते विकास महामंडळ आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी येथे अपघाताची शक्यता ही बळावली आहे.
याच ठिकाणावरून सेलू गावात जाणारा मार्ग आहे. राज्यमार्ग व गावात जाणारा मार्ग या मधात रस्ता दुभाजक बांधण्यात आले होते. अनेक वर्षांपासून वारंवार झालेल्या अपघातामुळे हे दुभाजक क्षतीग्रस्त झाले आहे. सध्या रस्ता दुभाजक या नावाने त्याचे केवळ अवशेष शिल्लक आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांसह, अनेक खात्याचे मंत्री, खासदार, आमदार येथून नियमित जातात. मात्र त्यांना दुभाजकांची ही अवस्था कशी दिसत असा प्रश्न सेलूकरांना व या मार्गाने नियमित प्रवास करीत असलेल्या पडला आहे.
सेलू ग्रामपंचायतीचे आता नगर पंचायतीमध्ये रूपांतर झाले त्यामुळे सेलूला शहराचा दर्जा प्राप्त झाला. पण येथील जीवघेण्या उणिवा कायम ठेवत खेड्याचे शहर करण्यात काय अर्थ असा सेलूवासीयांचा सूर आहे.
या ठिकाणी अनेक अपघात झाले. याच ठिकाणी धानोली चौकही आहे. मात्र नियमित होणाऱ्या अपघाताकडेही उदासीन यंत्रणा कान्हाडोळा करीत असल्याने सर्वसामान्यांचे जीवनच धोक्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.(तालुका प्रतिनिधी)