महामार्गाच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:28 IST2019-01-17T00:27:25+5:302019-01-17T00:28:18+5:30
बुटीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे बस स्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच बसच्या प्रतिक्षेत उभ्या राहणाऱ्या प्रवाशांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील चौकातच या महामार्गाचे काम सुरु असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बस थांबविण्याकरिता जागा शिल्लक राहिली नाही.

महामार्गाच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : बुटीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे बस स्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच बसच्या प्रतिक्षेत उभ्या राहणाऱ्या प्रवाशांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
येथील चौकातच या महामार्गाचे काम सुरु असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बस थांबविण्याकरिता जागा शिल्लक राहिली नाही. त्यामुळे बसचालक जागा मिळेल तिथे बस थांबवितो. परिणामी प्रवाशांची मोठी धावपळ व गैरसोय होत आहे. विशेषत: येथील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सेलू व वर्धा येथे शिक्षणाकरिता प्रवास करतात. त्यामुळे या चौकात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी राहत असल्याने बस पकडण्याच्या धावपळीत अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या महामार्गाच्या कामामुळे लगतच्या व्यावसायिंकाची दुकानेही हटविण्यात आली. आता काम सुरु असल्याने दुकानदारीही थाटता येत नसल्याने त्यांचे व्यवसाय उध्वस्त झाले आहे. रोजगार हिरावल्या गेल्यामुळे ते बेरोजगार होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. येथे हातगाड्या लावून तसेच आॅटोरिक्षा चालवून आपल्या संसाराचा गाडा चालवित होते. पण, या कामामुळे हातगाड्या लावण्यास जागा राहिली नाही. तसेच आॅटोरिक्षा उभी करण्यासही अडचणीचे ठरत असल्याने साऱ्यांचेच व्यवसाय चौपट झाले आहे. सध्या कच्च्या रस्त्यावरुन नागरिकांची वहिवाट सुरु असल्याने नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. आता नवीन बसस्थानक अर्धा किलो मीटर अंतरावर होणार असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना आणखीच त्रास सहन करावा लागणार आहे.
रस्त्यावरील मांस विक्रीच्या दुकानांमुळे रहदारीस अडथळा
मोझरी - ग्रामपंचायत लगतच्या मुख्यमार्गावर मांस विक्रीची दुकाने थाटल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. पण, याकडे ग्रामपंचात प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून ही दुकाने इतरत्र हलविण्याची मागणी केली आहे. मोझर (शेकापूर) येथे दर रविवारला आठवडी बाजार भरतो. यावेळी अनेक मांसविक्रेते रस्त्यावर दुकान लावून मांस विक्री करतात. गावात जाण्या-येण्याकरीता हाच मुख्य रस्ता आहे. येथूनच गावातील विद्यार्थी, आरोग्य उपकेंद्रात जाणारे नागरिक, रुग्ण ये-जा करतात. त्यामुळे साऱ्यांनाच या दुकानांमुळे अडचण निर्माण होत आहे. ग्रामपंचायतच्या सरपंच, सदस्यांनी याकडे लक्ष घालून ही रस्त्यावरील मांस विक्रीची दुकाने दुसरीक डे स्थलांतरीत करावी. तसेच आढावेढा घेतलेल्या या रस्त्याचे सरळीकीण करुन मार्ग रहदारीस मोकळा करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.