शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी रोखला रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 5:00 AM

शिवसेनेचे संदीप भिसे तसेच काँग्रेसचे टिकाराम घागरे व केशव चोपडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनामुळे कारंजा-भारसिंगी मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास खोळंबली हाेती. सुरुवातीला निवेदन देऊन खड्डे बुजविण्याची मागणी रेटली असता नाममात्र खड्ड्यांत माती टाकून खड्डे बुजवण्याचा देखावा करण्यात आला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी एकत्र येत काँग्रेस व शिवसेनेच्या नेतृत्त्वात रस्ता रोको करून रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजविण्याची मागणी एकमुखाने रेटली. 

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे) : मागील एक वर्षांपासून कारंजा येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हे काम युद्धपातळीवर पूर्ण व्हावे म्हणून मिक्सर प्लॅट  गोंधळी येथे तयार करण्यात आला आहे. परंतु, ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्याची चाळण झाली असून, जीवघेणे खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित धोरणाच्या निषेधार्थ आज शिवसेनाकाँग्रेसच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.शिवसेनेचे संदीप भिसे तसेच काँग्रेसचे टिकाराम घागरे व केशव चोपडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनामुळे कारंजा-भारसिंगी मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास खोळंबली हाेती. सुरुवातीला निवेदन देऊन खड्डे बुजविण्याची मागणी रेटली असता नाममात्र खड्ड्यांत माती टाकून खड्डे बुजवण्याचा देखावा करण्यात आला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी एकत्र येत काँग्रेस व शिवसेनेच्या नेतृत्त्वात रस्ता रोको करून रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजविण्याची मागणी एकमुखाने रेटली. आंदोलनाची माहिती मिळताच कारंजाचे ठाणेदार दारासिंग राजपूत यांनी आंदोलनस्थळ गाठून तालुका प्रशासनाला याची माहिती दिली. माहिती मिळताच बांधकाम विभागाचे पेंदे तसेच प्रभारी तहसीलदार राऊत यांनी आंदोलन स्थळ गाठून आंदोलनकर्त्यांची मागणी समजावून घेतली. ठोस आश्वासनाअंति आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. आंदोलनात शशिभूषण कामडी, राजू खवशी, चंद्रशेखर आत्राम, गोपाल गिऱ्हाळे, जीवन डोबले, दिलीप चौधरी, वाल्मीक ठाकरे, मेघराज खवशी, मंगेश डोबले, आजनादेवी गूळघाणे आदी सहभागी झाले होते. 

आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच केले भजन- संतप्त आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजविण्याच्या मागणीकडे तालुका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावरच बसून भजन सादर केली. या भजनांना खापरी येथील भजन मंडळींनी साथसंगत दिली.आठ दिवसांत होणार रस्ता गुळगुळीत- आंदोलनकर्त्यांची मागणी समजावून घेतल्यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत कारंजा-भारसिगी या मार्गावरील संपूर्ण खड्डे बुजविण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. 

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस