रेतीमाफियांची धामवर वक्रदृष्टी

By Admin | Updated: May 12, 2015 02:03 IST2015-05-12T02:03:28+5:302015-05-12T02:03:28+5:30

रेतीघाट म्हणून शासनदरबारी कुठलीही नोंद नसलेल्या पवनार येथील धाम नदीवर रेती माफियांनी मोर्चा वळविला आहे. येथे

Ritamapiala | रेतीमाफियांची धामवर वक्रदृष्टी

रेतीमाफियांची धामवर वक्रदृष्टी

डोळ्यांदेखत सर्रास उत्खनन : रेती उपस्याची शासकीय दरबारी कुठलीही नोंद नाही
पराग मगर ल्ल वर्धा

रेतीघाट म्हणून शासनदरबारी कुठलीही नोंद नसलेल्या पवनार येथील धाम नदीवर रेती माफियांनी मोर्चा वळविला आहे. येथे कोणाचे लक्ष राहत नसल्याची संधी साधत पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा होत आहे. उघड्यावर होत असलेला हा रेती उपसा साऱ्यांच्या नजरेस पडत असला तरी यावर कुणाकडूनही कारवाई होताना दिसत नाही.
जिल्ह्यातील काही नद्यांवर ठराविक ठिकाणी रेतीघाट देण्यात आलेले आहे. त्याची शासनदरबारी नोंद आहे. या घाटांचा लिलाव होवून त्यातून रेती काढली जात आहे. यात अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने रेतीचे नियमबाह्य उत्खनन होत आहे. यावर कारवाई करण्याकरिता अनेक वेळा शासनाच्यावतीने धडक मोहीम राबविल्या गेली. यात घाटांवर कारवाईच्या नावावर कागद काळे केले जात असल्याचे समोर आले आहे. कुणावरही विशेष कारवाई झाली नसल्याचे वास्तव आहे.
नदीवर रेतीघाट देताना बरेच नियम आहेत. यातील सर्वच नियम पाळले जातात असे नाही. त्यातील अनेक नियम पायदळी तुडविल्या जात आहेत. याचेचे उदाहरण पवनार येथे दिसून येत आहे. येथे घाटाची कुठलीही परवानगी नसताना धाम नदीपात्रातून रेतीचा उपसा होत आहे. या नदीपात्रातून दररोज एक ते दोन ट्रॉली रेतीचा उपसा केला जातो. मुख्य म्हणजे स्वत:च्या उपयोगासाठी हा रेतीउपसा केला जात नाही तर विकण्यासाठी ही रेती काढली जात आहे. सर्वांच्या डोळ्यादेखत हा प्रकार सुरू असताना कुणीही याबद्द्ल एक शब्दही काढत नाही. त्यामुळे अनेक आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाला आहे. त्यांच्याकडून पटवाऱ्याला याची कल्पना देण्यात आली आहे. मात्र त्यांच्याकडून पोलीस प्रशासनाला कुठलीही कल्पना देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे.


धरणातूनही काढली जाते रेती
४पवनार येथे धाम नदीवर धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. महाकाळी धरणातून येथे पाणी सोडले जाते. या धरणातून वर्धा नगर परिषद तसेच भूगाव येथील स्टील प्लांटसाठी पाणीपुरवठा केला जातो. या कारणाने दरवर्षी येथे बरीच वाळू वाहून येते. हीच रेती मजुरांच्या सहाय्याने काढून ती गाळून ती विकली जात आहे.
दर्गाह टेक डीच्या मागल्या बाजूनेही होतो उपसा
४रेतीउपसा करीत असलेल्या चोरट्यांनी आपल्या जागा निश्चित केल्या असून अनेक ठिकाणांवरून पवनार परिसरात रेतीउपसा केला जातो. उन्हाळ्याचे दिवस असल्याने याच काळात पात्र कोरडे पडत असते. याचाच फायदा घेत रेतीचोरटे सक्रीय होतात. दर्गाह टेकडीच्या मागल्या बाजूलाही रेतीचा उपसा होतो. परंतु यामुळे टेकडी खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतीची कामे नसल्याने हा व्यवसाय करीत असल्याचे सांगण्यात येते.

भर पाण्यातून उपसा
४रेतीचा उपसा करताना नदीला पाणी आहे, एखादी दुर्दैवी घटना शक्यता असताना कुठलीही काळजी न करता भर पाण्यातून रेतीचा उपसा करण्यात येत आहे. पाण्यातून काढलेल्या रेतीचा ढिग लावून ती चाळणीने गाळून विकल्या जात आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.

Web Title: Ritamapiala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.