विनयभंगासह जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 06:00 IST2020-02-12T06:00:00+5:302020-02-12T06:00:13+5:30
५ मार्च २०१५ ला फिर्यादीचा पती कापूस भरण्यासाठी बाहेर गेला होता. त्यावेळी पीडिता ही तिच्या मुलासोबत घरी होती. दरम्यान आरोपी राजू इंगळे याने पीडितेच्या घरात प्रवेश करून तिचा विनयभंग केला. शिवाय जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने आरडा-ओरड केली. शिवाय दरम्यान पीडितेचा पती घरी आला. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून देवळी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

विनयभंगासह जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास सश्रम कारावास
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील जिल्हा न्यायाधीश २ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एम. मिश्रा यांनी आरोपी राजू विनायक इंगळे (३५) रा. कोल्हापूर शिंगारवाडी ता. देवळी यास विशेष प्रकरण क्र.१०/२०१५ शासनविरूद्ध राजू इंगळे मध्ये कलम ३५४ भादंवि नुसार १ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा तसेच कलम ५०६ अन्वये १ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिन्याची साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तर अनुसुचित जाती जमाती कायद्यातून निर्दोषमुक्त केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, ५ मार्च २०१५ ला फिर्यादीचा पती कापूस भरण्यासाठी बाहेर गेला होता. त्यावेळी पीडिता ही तिच्या मुलासोबत घरी होती. दरम्यान आरोपी राजू इंगळे याने पीडितेच्या घरात प्रवेश करून तिचा विनयभंग केला. शिवाय जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने आरडा-ओरड केली. शिवाय दरम्यान पीडितेचा पती घरी आला. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून देवळी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजन पाली यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. पैरवी अधिकारी म्हणून एन. पी. सी. निलेश सडमाके व एन. पी. सी. समीर कडवे यांनी काम पाहिले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद आणि पुरावे ग्राह्य धरून न्या. आर. एम. मिश्रा यांनी आरोपीला वरिल शिक्षा ठोठावली. शासकीय बाजू अॅड. अमोल कोटंबकर यांनी मांडली.