सखींवर बक्षिसांची लयलूट
By Admin | Updated: August 9, 2014 23:53 IST2014-08-09T23:53:48+5:302014-08-09T23:53:48+5:30
पुलगाव येथील महावीर भवन येथे रंगलेल्या सखी मंचच्या ‘खुल जा सीम सीम’ या कार्यक्रमात संखींनी कधी गुणदर्शनाने, कधी चढाओढ करुन, कधी स्पर्धा जिंकून तर कधी नशीब आजमावून भरघोस बक्षीस पटकावली.

सखींवर बक्षिसांची लयलूट
स्पर्धा: खुल जा सिम सिम कार्यक्रमात सखी रंगल्या
वर्धा: पुलगाव येथील महावीर भवन येथे रंगलेल्या सखी मंचच्या ‘खुल जा सीम सीम’ या कार्यक्रमात संखींनी कधी गुणदर्शनाने, कधी चढाओढ करुन, कधी स्पर्धा जिंकून तर कधी नशीब आजमावून भरघोस बक्षीस पटकावली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे आगमन, दीपप्रज्वलन आणि प्रेरणागीताने करण्यात आली. जिल्हा संयोजिका पल्लवी पुरोहित यांनी सखी मंचची भूमिका आपल्या प्रास्ताविकात मांडली. उत्साहात सखींनी केलेल्या सहभागाच्या नोदणीनुसार सखींना चिठ्ठीत निघालेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर देवून पात्र ठरल्यास पुढच्या फेरीतील खुलजा सीम सीम मध्ये तीन पैकी एका डब्यात बक्षीस ठेवले असल्याने तो डबा निवडून आपले नशीब आजमायचे होते.
पहिल्या फेरीतली ज्ञानाची परीक्षा आणि नंतरची ‘हा डबा की डबा की तो डबा’ या सखीच्या लगबगीला बघण्यातली मजाही प्रेक्षक सखींनी लुटली. प्रेक्षकांमधूनही उत्स्फूर्तपणे प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या सखींना बक्षीसांची संधी मिळाली. सध्याचे राजकारण, सामाजिक प्रश्न, नामवंत व्यक्ती, देश, राज्यघटना आणि दैनंदिनी यावर आधारित प्रश्नावली सखींनी सोडवली व अनेक बक्षीसे पटकाविली. त्यानंतर जॅकपॉट मध्ये विशिष्ट चिठ्ठीप्रमाणे विजेते ठरवण्यात आले. खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता पुलगावच्या पद्मा लुंकड, कविता बदनोरे या सखींनी सहकार्य केले.
जॅकपॉट विजेत्या वर्षा मेंढे, अनघा बदनोरे, अलका बानाईत, सुशिला खेडझोड या सखी ठरल्या तर पल्लवी पाटणी, मनीषा चौरसिया, नम्रता हाडगे, मंजुषा शेंडे, ललिता खडसे, सुषमा पांडे, लता भोयर, मीना शुक्ला, चंदा हिवरकर, मंजु अरोरा, मिनाक्षी शर्मा, लता यावले, राखी लुंकड, राणी लुंकड, रश्मी पाटणी, श्रेया पाटणी, पौर्णिमा पाटणी, आरती झांझरी, नलिनी ढोबळे, निम्मी चौरसिया, कल्पना दर्डा, शुभांगी इंगळे यांनी खुलजा सीम सीम या स्पर्धेमध्ये बक्षीस प्राप्त केले. अनेक सखी यात सहभागी झाल्या होत्या. सर्व सहभागी सखींचे आभार मानण्यात आले.(उपक्रम प्रतिनिधी)