आधी मोबदला द्या, मगच ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:57 IST2019-04-29T22:56:45+5:302019-04-29T22:57:01+5:30
राष्ट्रीय महामार्ग अवार्डनुसार बांधकामाचा मोबदला न देता बळजबरीने जागा खाली करण्याचा प्रयत्न होत आहे. याला विरोध करीत आज सेलडोह येथील नागरिकांनी तहसीलदारांना चांगलेच धारेवर धरुन आधी मोबदला द्या, नंतरच ताबा घ्या, असा निवेदनातून इशारा दिला आहे.

आधी मोबदला द्या, मगच ताबा
केळझर : राष्ट्रीय महामार्ग अवार्डनुसार बांधकामाचा मोबदला न देता बळजबरीने जागा खाली करण्याचा प्रयत्न होत आहे. याला विरोध करीत आज सेलडोह येथील नागरिकांनी तहसीलदारांना चांगलेच धारेवर धरुन आधी मोबदला द्या, नंतरच ताबा घ्या, असा निवेदनातून इशारा दिला आहे.
७ मे २०१९ पर्यंत भुसंपादीत जागा खाली करा अन्यथा सक्तीने हटविण्यात येईल. अशी नोटीस सेलडोहच्या नागरिकांना देण्यात आल्या परंतु ग्रामस्थांनी स्वीकारल्या नाही. बांधकाम अवार्ड प्रमाणे बांधकामाचा मोबदला देण्यास भू-संपादन विभागाकडून संपूर्ण प्रक्रीया पार पडली. पण, विस्थापितांच्या खात्यावर ती रक्कम अद्यापही पोहचली नाही. आधी बांधकामाचा मोबदला द्या मग जागा घ्या अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. आज तहसीलदारांना घेराव करून निवेदन दिले. यावेळी रविंद्र खोडे, किसन खोडे, प्रफुल खोडे, उदय मेहुणे, मिरा सोनटक्के, शामसुंदर झाडे, ज्ञानेश्वर झाडे, रत्नाकर खोडे, किसना बजाईत, निलीमा बाराहाते, अतुल सोनटक्के, रामचंद्र वैद्य यांच्यासह नागरिक उपस्थित होते.